Bribe Case: लाच मागितल्या प्रकरणी एसीबीकडून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दोन लिपिकांना अटक
Arrested

राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) मालमत्ता कर संकलन विभागातील दोन लिपिकांना (Clerk) 8,500 रुपयांची लाच (Bribe) मागितल्या प्रकरणी अटक केली आहे. मालमत्तेचे हस्तांतरण आणि मालमत्ताधारकाच्या नावावर बदल करण्यासंबंधीचे कागदपत्र पूर्ण करण्यासाठी या दोघांनी लाच घेतल्याचा आरोप आहे. एसीबीने प्रदीप कोठावदे आणि हैबती मोरे यांना अटक केली आहे. दोघेही सध्या पीसीएमसीच्या थेरगाव मालमत्ता कर संकलन कार्यालयात कार्यरत आहेत. रिअल इस्टेट एजंट असलेल्या तक्रारदाराने मालमत्ता हस्तांतरणाशी संबंधित औपचारिकता पूर्ण करण्यासाठी नुकतेच थेरगाव मालमत्ता कर संकलन कार्यालयात संपर्क साधला होता. हेही वाचा Internet Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नाद, क्राइम पेट्रोल पाहून लहान मुलाची हत्या; आरोपी अल्पवयीन

कोठावडे आणि मोरे यांनी अनुक्रमे 5,500 आणि 3,000 रुपयांची लाच मागितली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, तक्रारदाराने त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर गुरुवारी लाचेच्या मागणीची पडताळणी करून शुक्रवारी सायंकाळी थेरगाव कर संकलन कार्यालयात सापळा रचण्यात आलातक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर कोठावडे व मोरे यांना अटक करण्यात आली. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीनुसार वाकड पोलीस ठाण्यात प्रथम माहिती अहवाल दाखल करण्यात आला आहे.