Central Board of Secondary Education कडून त्यांच्या 10वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने काही नियमावली जारी करण्यात आली आहे. यामध्ये परीक्षेच्या वेळेस कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार टाळण्यासाठी ही नियमावली आहे.
सीबीएससी शी संलग्न शाळेतील विद्यार्थ्यांना आणि पालकांना अयोग्य गोष्टी कोणत्या याची माहिती देण्याचं आवाहन बोर्डाने केले आहे. नियमभंग करणार्यांवर कारवाई केली जाईल असं बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. तसेच कारवाई मध्ये सध्याच्या वर्षी आणि पुढील वर्षी देखील परीक्षा देता येणार नाही असे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.
सीबीएसई कडून जारी नियमावली
कोणत्या गोष्टींना परवानगी असेल?
- नियमित विद्यार्थ्यांना अॅडमीट कार्ड आणि स्कूल आयडी सोबत ठेवता येईल तर प्रायव्हेट विद्यार्थ्यांना गर्व्हमेंट आय डी सोबत ठेवता येणार
- ट्रांसपरंट पाऊच, निळा पेन, पट्टी, पेंसिल सारख्या स्टेशनरीच्या वस्तू
- घड्याळ, पारदर्शक पाण्याची बाटली
- मेट्रो कार्ड, बस पास
कोणत्या गोष्टींना परवानगी नसेल?
- कम्युनिकेशन डिव्हाईस ज्यामध्ये फोन, ब्लुटूथ डिव्हाईस, इयरफोंस, स्मार्टवॉच, कॅमेरा
- कॅल्युलेटर, पेन ड्राईव्ह, लॉग टेबल, इलेक्ट्रॉनिक पेन्स, स्कॅनर
- वॉलेट, हॅन्डबॅग, गॉगल्स
- खाण्याचे पदार्थ (मधुमेही विद्यार्थी अपवाद)
ड्रेस कोड बाबतचे नियम
- नियमित विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश घालणं अनिवार्य आहे
- खाजगी विद्यार्थ्यांना लाईट रंगांचे कपडे परिधान करावे लागतील.
इथे पहा सीबीएससी बोर्डाची अधिकृत नोटीस
ही मार्गदर्शक तत्त्वे विद्यार्थी आणि पालकांसोबत शेअर करण्याचे काम मुख्याध्यापक आणि शाळा अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. परीक्षेच्या दिवशी, शाळांनी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रतिबंधित वस्तू घेऊन जाणे टाळण्याची आठवण करून दिली पाहिजे. याव्यतिरिक्त, communication devices ताब्यात घेणे किंवा अफवा पसरवणे हे नियमांचे उल्लंघन मानले जाईल, अशा विद्यार्थ्यांना सुरू परीक्षा आणि त्यापुढील परीक्षांमध्येही सहभागी होता येणार नाही.