अनेक तरुणांना नोकरी (Job ) अथवा व्यवसाय (Business) करायचा असतो. पण नेमकी कोणती नोकरी अथवा कोणता व्यवसाय करायचा याबाबत मात्र त्यांच्यासमोर मोठा संभ्रम असतो. एका तरुणाला मात्र एक भन्नाट अशी आयडीयाची कल्पना (Job Opportunities) सुचली आहे. होय, या तरुणाने चक्क रांगेत उभा (Queue Advantage) राहण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. फ्रेडी बेकिट (Freddie Beckitt ) असे या तरुणाचे नाव असून, या व्यवसायातून तो भक्कम पैसेही कमावतो. या तरुणाने दावा केला आहे की, त्याच्या या कामातून त्याला म्हणे कधी कधी प्रतिदिन 15 ते 16 हजा रुपयांचीही कमाई होते. आता बोला.
फ्रेडी बेकिट (Freddie Beckitt ) नावाच्या या व्यक्तीबद्दल Mirror ने वत्त दिले आहे. या वृत्तात म्हटले आहे की, फ्रेडी बेकिट हा गृहस्थ रांगेत उभा राहून लोकांना मदत करतो आणि पैसे कमावतो. म्हणजे ज्या ठिकाणी लोकांना रांगेत उभा राहून काम करायचे असते. जसे की, बँक, सरकारी कार्यालय, नोंदमी ऑफीस वैगेरे. अशा ठिकाणी लोकांना अनेकदा तास.. तासभर उभे राहावे लागते. अशा वेळी लोकांचा वेळही मोठ्या प्रमाणावर वाया जातो आणि थकवाही येतो. मात्र ज्या लोकांना रांगेत उभा राहायचे नसते त्यांना फ्रेडी गाठतो. किंवा लोकच त्याला शोधत येतात. या लोकांऐवजी रांगेत उभा राहून फ्रेडी बेकिट नंबर लावतो. जेव्हा नंबर येतो तेव्हा फ्रेडी त्या व्यक्तीला कळवतो. त्यासाठी तो काही रक्कम शुल्क म्हणून आकारतो. यामुळे होते असे की, फ्रेडी बेकिट यालाही चांगलेच पैसे मिळतात आणि संबंधितांचा वेळही वाचतो. (OnlyFans Porn: जॉब सोडून जोडप्याने 'ओन्ली फॅन्स’वर Sex Video बनवायला केली सुरुवात; महिन्याची कमाई ऐकून बसेल धक्का)
फ्रेडी बेकिट सांगतो की, जवळपास तीन वर्षांपासून हे काम तो करत आला आहे. या कामातून त्याला चांगले पैसे मिळतात. कधी कधी तर या कामातून त्याला चक्क 15 ते 16 हजार रुपये मिळत असल्याचेही तो सांगतो. म्यूझिक कॉन्सर्ट असो किंवा स्पोर्ट टुर्नामेंट. अशा विविध ठिकाणी उभे राहून फ्रेडी तिकीट खरेदी करतो, फ्रेडी लंडन येथे राहतो आणि तिथेच ही सेवा देतो. तो सांगतो की, सर्वसाधारणपणे एक वेळी उभे राहण्याचे त्याला 2 हजार रुपये मिळतात. त्यासाठी त्याला कमीत कमी एक तासभर वेळ खर्च करावा लागतो.