Central Bank Of India मध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी नोकर भरती, 17 डिसेंबर पूर्वी करता येईल अर्ज
प्रतिकात्मक फोटो (File Photo)

Central Bank Of India Recruitment 2021: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सध्या स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी नोकर भरती केली जात आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी येत्या 17 डिसेंबर पूर्वी अधिकृत संकेतस्थळ www.centralbankofindia.co.in येथे भेट द्यावी. तर उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यामुळे अंतिम तारखेपूर्वी अर्ज करावा. त्यानंतर कोणाचाही अर्ज स्विकारला जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार, या बँकेच्या नोकर भरतीसाठी एसओच्या एकूण 115 पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. तर सीबीआयकडून या पदासाठी आयोजित होणाऱ्या परीक्षेसाठी प्रवेश प्रक्रिया 11 जानेवारी 2022 रोजी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. तर एसओ परीक्षा 22 जानेवारी 2022 मध्ये आयोजित केली जाणार आहे.(Indian Oil मध्ये 300 अप्रेंटिस पदासाठी नोकर भरती, जाणून घ्या अधिक)

महत्वाच्या तारखा-

-ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची तारीख- 23 नोव्हेंबर,2021

-ऑनलाईन शुल्क भरण्याची आणि अर्जाची अंतिम तारीख- 17 डिसेंबर,2021

-कॉल लेटर डाउनलोड-11 जानेवारी, 2022

-सीबीआय एसओ परीक्षा- 22 जानेवारी 2022

सीबीआय एसओ परीक्षा 22 जानेवारी 2022 रोजी आयोजित केली जाणार आहे. तर उमेदवारांना लेखी परीक्षा इंग्रजी आणि हिंदीत उपलब्ध असणार आहे. ऑनलाईन लेखी परिक्षेचे आयोजन विविध ठिकाणी केले जाणार आहे. त्यामुळे अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.