भारतातील सर्वाधिक मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या विविध ट्रेड मध्ये ट्रेड अप्रेंटिस आणि टेक्निशियन अप्रेंटिस पदासाठी नोकर भरती केली जाणार आहे. कंपनी द्वारे जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशन नुसार, फिटर, इलेक्ट्रिशन, इलेक्ट्रॉनिक मॅकेनिक, इंस्ट्रुमेंट मेकेनिक, मशीनिस्ट, अकाउंटट, डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि रिटेल सेल्स ट्रेडसह इलेक्ट्रिकल, इंस्ट्रुमेंटेशन, सिविल, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड इलेक्ट्रॉनिक्स मध्ये टेक्निशियन अप्रेंटिसच्या 300 पदावर योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
इंडियन ऑयल ट्रेड अॅन्ड टेक्निशिय अप्रेंटिस भरती 2021 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी iocl.com येथे अप्रेंटिसशिप सेक्शन मध्ये दिलेल्या लिंकवर भेट द्यावी. अर्ज प्रक्रिया 10 डिसेंबर पासून सुरु झाली असून 27 डिसेंबर ही अखेरची तारीख आहे. उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
ट्रेड अप्रेंटिस (फिटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मॅकेनिक, इंस्ट्रुंमेंट मॅकानिक, मशीनिस्ट) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून कमीत कमी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण असावे. त्याचसंबंधित ट्रेडमध्ये दोन वर्ष आयटीआय कोर्स ही केलेला असावा.(RBI Summer Internship 2022: इंटरनशिपसाठी येत्या 31 डिसेंबर पर्यंत करता येईल अर्ज, जाणून घ्या अधिक)
ट्रेस अप्रेंटिस (डीईओ) साठी अर्ज करायचा असेल तर कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून 12 परीक्षा उत्तीर्ण असावे. डेटा एन्ट्री ऑपरेटर मध्ये स्किल सर्टिफिकेट असावे. त्याचसोबत ट्रेड अप्रेंटिस (रिटेल सेल्स) पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास असावे.
टेक्निशियन अप्रेंटिस (इलेक्ट्रिक, इंस्ट्रुमेंट, सिविल, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल अॅन्ड इलेक्ट्रॉनिक्स) पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून कमीतकमी 50 टक्के गुणांसह संबंधित विषयात 3 वर्षीय डिप्लोमा केलेला असावा.