Central Bank of India Recruitment 2021: युजी, पीजी, एमबीए तरुणांसाठी नोकरीची संधी
Central Bank Of India (Photo Credits: Wikimedia)

Central Bank of India Recruitment 2021:  जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदासाठी नोकर भरती केली जाणार आहे. त्यानुसार सिक्युरिटी ऑफिसर, रिस्क मॅनेजर, फाइनानशियेल अॅनालिस्ट क्रेडिट ऑफिसर, इकोनॉमिस्ट, डेटा साइंटिस्ट, टेक्निकल ऑफिसर, लॉ ऑफिसर, इनकम टॅक्स ऑफिसरह अन्य पदांवर नोकर भरती केली जाणार आहे.(CSEET November 2021 Result: नोव्हेंबर महिन्यातील ICSI CSEET परीक्षेचा निकाल आज दुपारी 4 वाजता; icsi.edu वर असे पहा मार्क्स)

ज्या उमेदवारांना या नोकर भरतीसाठी अर्ज करायचा असेल त्यांनी centralbankofindia.co.in येथे भेट द्यावी. अर्ज करण्याची प्रक्रिया 23 नोव्हेंबर पासून सुरु होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 डिसेंबर आहे. त्यानंतर कोणतेही अर्ज स्विकारले जाणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले आहेत.

महत्वाच्या तारखा-

-ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख : 23 नोव्हेंबर, 2021

-ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 17 डिसेंबर, 2021

-सीबीआय एसओ अॅडमिट कार्डची तारीख अस्थायी: 11 जानेवारी, 2021

-सीबीआय एसओ परीक्षा तारीख: 22 जानेवारी, 2022

Economist च्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने बँकिंग/कॉमर्स/पब्लिक पॉलिसीसह अन्य विषयात पीएचडी डिग्री घेतलेली असावी. या व्यतिरिक्त वाणिज्यिक बँकेत कमीत कमी 5 वर्षांचा कामाचा अनुभव असावा.

इनकम टॅक्स ऑफिसर पदासाठी अर्ज करणार्या उमेदवाराने चाटर्ड अकाउंटची डिग्री घेतली असावी. या व्यतिरिक्त कमीत कमी 10 वर्षांचा कामचा अनुभव असावा अशी अट आहे.

डेटा साइंटिस्ट पदासाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून Statistics/Econometrics/Mathematical/Finance/Economics/Computer Science मध्ये पीजी डिग्री घेतली असावी. तर उमेदवाराला 8-10 वर्षांचा अनुभव असावा.

तसेच फाइनाशियेल अॅनालिस्टसाठी उमेदवाराने CA/ICWA किंवा फाइनान्स मध्ये MBA केलेले असावे. या व्यतिरिक्त संबंधित फिल्डमध्ये 3 वर्षांचा अनुभव असावा. विविध पदाच्या नोकर भरतीसाठी अधिक योग्यतेसंदर्भातील माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.