Results | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Institute of Company Secretaries of India कडून Company Secretary Executive Entrance Test अर्थात ICSI CSEET Result 2021 आज (19 नोव्हेंबर) जाहीर करण्यात येणार आहे. ICSI कडून नोव्हेंबर महिन्यातील परीक्षेचा निकाल आज 4 वाजता जाहीर होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. हा निकाल विद्यार्थी अधिकृत वेबसाईट icsi.edu यावर पाहू शकतात.

ICSI CSEET Result 2021 परीक्षा यंदा 13 आणि 14 नोव्हेंबर दिवशी पार पडली आहे. यंदा मुख्य परीक्षेपूर्वी ICSI कडून मॉक टेस्ट देखील घेण्यात आली होती. यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा पॅटर्नचा नेमका अंदाज येण्यास मदत झाली होती. त्यनंतर री टेस्टचा देखील घेण्यात आल्या होत्या.

परीक्षेचा निका पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर सोबत ठेवावा लागणार आहे. दरम्यान तुमचा निकाल कसा पहाल? हे स्टेप बाय स्टेप इथे पहा-

ICSI CSEET Result 2021 कसा पहाल?

  • Institute of Company Secretaries of India च्या अधिकृत वेबसाईटला icsi.edu ला भेट द्या.
  • होम पेज वर 'Click here to view CSEET November result' या लिंक वर क्लिक करा.
  • Registration Number सह तुमचे आवश्यक क्रेडेन्शिअल टाकून लॉगिन करा.
  • ICSI CSEET Result 2021 तुमच्या स्क्रीनवर झळकेल.
  • तुमच्या निकालाची प्रत डाऊनलोड करून प्रिंट आऊट काढून ठेवा.

विद्यार्थ्यांना अंतिम निकालासोबत विषयानुसार गुणांचा ब्रेक अप देखील दाखवला जाणार आहे. यंदा देखील कोविडच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना निकाल हा ऑनलाईनच दाखवला जाणार आहे. हा निकाल पोस्ट द्वारा शेअर केला जाणार नाही.