CBSE ने पुढील शैक्षणिक वर्षापासून पुन्हा वर्षातून एकदा बोर्ड परीक्षा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड पूर्व काळाप्रमाणे आता शैक्षणिक परीक्षा पद्धती राबवली जाणार आहे. Ministry of Education ने दिलेल्या माहितीनुसार, आता 10वी,12वीच्या परीक्षा दोन टर्म मध्ये विभागल्या जाणार नाहीत.
2021-22 या शैक्षणिक वर्षामध्ये सीबीएसई बोर्डाने टर्म 1 ची परीक्षा नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात आणि टर्म 2 ची परीक्षा एप्रिल - मे महिन्यात आयोजित केली आहे. आता टर्म 2 ची परीक्षा 26 एप्रिल पासून सुरू होणार आहे ती जून महिन्यापर्यंत चालेल. निकालामध्ये अधिक वेटेज हे टर्म 2 ला देण्याची शक्यता आहे. नक्की वाचा: CBSE Term 2 Admit Cards 2022: 10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांची हॉल तिकीटं जारी; cbse.gov.in वरून अशी करा डाऊनलोड!
मागील वर्षी कोरोनाच्या लाटेत विस्कळीत झालेल्या शैक्षणिक वर्षाची बोर्ड परीक्षा रद्द झाली होती. विद्यार्थ्यांना त्यांच्या अंतर्गत मूल्यमापनातून बोर्डाचा निकाल देण्यात आला आणि यंदा कोविड संकटामुळेच परीक्षा दोन टर्म मध्ये विभागण्यात आली आहे. आता शाळांनीही एकच परीक्षा असावी यासाठी बोर्डाकडे रिप्रेझेंटेशन सादर केले आहे. बोर्डाने कधीच दोन टर्म परिक्षा या कायमस्वरुपी असतील असं जाहीर केलं नसल्याची माहिती बोर्डाच्या अधिकार्यांनी दिली आहे. हा केवळ वन टाईम फॉर्म्युला होता. नक्की वाचा: CBSE Term 2 Exam 2022: सीबीएसई बोर्डाने 26 एप्रिल पासून सुरू होणार्या परीक्षेसाठी जारी केली नियमावली; लवकरच Admit Card होणार प्रसिद्ध.
National Education Policy 2020 च्या नुसार, विद्यार्थी दोनदा परीक्षा देऊ शकतात.