सीबीएसई बोर्डाच्या (CBSE Board) 10वी, 12वी परीक्षांच्या यंदाच्या निकालानंतर या महिन्याच्या शेवटाला The Central Board of Secondary Education आता दहावी, बारावीच्या ऑफलाईन परीक्षा घेणार आहे. यासाठी सीबीएसई कडून रेग्युलर आणि प्रायव्हेट कॅन्डिटेड्स साठी खास नोटिफिकेशन जारी केले आहे. या सूचना येत्या काही दिवसात सीबीएसई बोर्डाच्या होणार्या Compartment and Improvement Exams देणार्यांसाठी आवश्यक आहेत. मग त्यामध्ये तुमचा देखील समावेश होत असेल तर या सूचना वेळीच जाणून घेणं आवश्यक आहे. यामध्ये बोर्डाने विद्यार्थ्यांची विविध कॅटेगरी मध्ये विभागणी केली आहे.नक्की वाचा: CBSE Board Revised Syllabus Update: 10वी, 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी सुधारित अभ्यासक्रम जाहीर; cbseacademic.nic.in वर पहा Term Wise Syllabus.
सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी सूचना
(A)मूल्यांकनाने नाखूष: अंतर्गत मूल्यपान पद्धतीने लावण्यात आलेल्या निकालामध्ये 'पास' झाले पण मूल्यांकनाने खूष नसलेले विद्यार्थी
(B)श्रेणी सुधार: Main Examination 2021 साठी Private Candidates म्हणून रजिस्ट्रेशन केलेले विद्यार्थी
(C)अधिकचे विषय: Additional Subject category मध्ये Main Examination 2021 साठी Private Candidates म्हणून रजिस्टर झालेले
(D)2nd chance compartment (2019 चे विद्यार्थी) : Main Examination 2021 साठी Private Candidates म्हणून रजिस्ट्रेशन केलेले असे विद्यार्थी ज्यांनी 2019 मध्ये परीक्षा दिली आहे. तसेच यांचा निकाल COMPARTMENT म्हणून लागला असून जुलै 2019 च्या पहिल्या प्रयत्नातही पास होऊ न शकलेले. या विद्यार्थ्यांनी दुसर्या प्रयत्नासाठी अर्ज केला आहे. पण फेब्रुवारी,मार्च 2020, सप्टेंबर 2020 मध्ये परीक्षा न झाल्याने प्रतिक्षेत असलेले विद्यार्थी
(E)2nd chance compartment (2020चे विद्यार्थी) : Main Examination 2021 साठी Private Candidates म्हणून रजिस्ट्रेशन केलेले असे विद्यार्थी ज्यांनी 2020 मध्ये परीक्षा दिली आहे. तसेच यांचा निकाल COMPARTMENT म्हणून लागला असून सप्टेंबर 2020 च्या पहिल्या प्रयत्नातही पास होऊ न शकलेले आणि आता 2021 मध्ये दुसर्या प्रयत्नासाठी अर्ज केलेले
(F) प्रायव्हेट स्पेशल केसेस: दिल्ली मध्ये महिला आणि CWSN candidates ज्यांनी Main Examination 2021 साठी Private Candidates म्हणून रजिस्ट्रेशन केलेले आहे.
CBSE कडून यंदा Improvement Of Marks साठी 25 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर दरम्यान परीक्षा घेतली जाणार आहे. तर निकाल हा 30 सप्टेंबरला जाहीर केला जाणार आहे.यंदा 35 लाख विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन झाले आहे. यापैकी किमान 30% विद्यार्थी 10,12वीच्या ऑफलाईन परीक्षेला सामोरे जाऊ शकतात असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.