CBSE Board Revised Syllabus Update: 10वी, 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी सुधारित अभ्यासक्रम जाहीर; cbseacademic.nic.in वर पहा Term Wise Syllabus
Representational Image (Photo Credits: PTI)

CBSE Board Revised Syllabus Update: सीबीएसई बोर्डाकडून (CBSE) कडून यंदा नवी Assessment Policy जारी करण्यात आल्यानंतर आता बोर्डाकडून इयत्ता नववी ते बारावी च्या वर्गासाठी टर्म नुसार अभ्यासक्रम देखील जारी करण्यात आला आहे. CBSE Board Exams 2022 साठी हा टर्मनुसारचा अभ्यासक्रमार ग्राह्य धरला जाणार आहे. cbseacademic.nic.in या बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर आता विषयानुसार curriculum जारी करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांना अभ्यासाचं नियोजन करणं सोप्प होणार आहे.

यंदा कोविड19 च्या पार्श्वभूमीवर इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम 2 टर्म मध्ये विभागला गेला आहे.तसेच काही अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे. मान्य करण्यात आलेल्या  सध्याच्या अभ्यासक्रमामधून 50% अभ्यासक्रम हा टर्म 1 मध्ये तर उर्वरित अभ्यासक्रम टर्म 2 मध्ये पूर्ण केला जाणार आहे. COVID-19 च्या पार्श्वभूमीवर पहिली ते बारावीच्या यंदाच्या अभ्यासक्रमातही 25% कपात; मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती.

CBSE Board परीक्षेसाठी अभ्यासक्रम पाहण्यासाठी डिरेक्ट लिंक 

इथे CBSE Revised Syllabus for Board Exams 2022 वर क्लिक करून देखील विद्यार्थी, पालक, शिक्षक ऑनलाईन अभ्यासक्रम पाहू शकतात.

टर्म 1 ची परीक्षा सीबीएससी बोर्ड MCQ प्रश्नावलीच्या माध्यमातून घेईल तर टर्म 2 ही MCQ किंवा सब्जेक्टिव्ह असेल. टर्म 2 च्या वेळेस कोरोना परिस्थिती पाहून हा निर्णय घेतला जाईल. याचे सॅम्पल पेपर्स देखील जारी केले जातील. यंदा टर्म 1 ची परीक्षा नोव्हेंबर -डिसेंबर मध्ये घेतली जाईल आणि टर्म 2 ही मार्च -एप्रिल मध्ये होणार आहे.

दरम्यान यंदाचा 10वी आणि 12वीचा निकाल कधी लागणार याकडे पालक, विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. राज्य शिक्षण मंडळाचे, COUNCIL FOR THE INDIAN SCHOOL CERTIFICATE EXAMINATIONS चे निकाल लागल्यानंतर आता सीबीएसईच्या विद्यार्थ्यांनाही त्यांच्या बोर्ड परीक्षा निकालाचे वेध लागले आहेत.