CBSE कडून यंदाच्या 2024-25 या शैक्षणिक वर्षाच्या 10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल परीक्षांचे वेळापत्रक (Practical Exam) जारी करण्यात आले आहे. जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, सीबीएससी बोर्डाकडून प्रॅक्टिकल परीक्षा 1 जानेवारी 2025 पासून सुरू होणार आहेत. तर यंदा सीबीएससी च्या लेखी परीक्षा 15 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहेत.
दरम्यान सीबीएससी च्या हिवाळी सत्रातील शाळांच्या प्रॅक्टिकल परीक्षा 5 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधी मध्ये पार पडणार आहेत. बोर्डाकडून त्याबाबतची SOP जारी केली आहे. हिवाळी सत्रातील शाळांसाठी प्रॅक्टिकल्स, प्रोजेक्ट आणि इंटर्नल असेसमेंट कसे घ्यायचे? याबाबत नियमावली जारी केली आहे. त्यांच्यासाठी जानेवारी 2025 मध्ये शाळा बंद राहणार आहेत. नक्की वाचा: CBSE Introduces CCTV Policy in Board Exams 2025: आगामी बोर्ड परीक्षांसाठी सीबीएसईचे सीसीटीव्ही धोरण जाहीर; शाळेच्या आवारात बसवण्यात येणार कॅमेरे .
इथे पहा प्रॅक्टिकल परीक्षा तारखांचे नोटिफिकेशन
CBSE ने जारी केलेल्या माहितीनुसार, आता प्रत्येक विषयात एकूण 100 गुण असतील, ज्यामध्ये यादीत दिलेल्या ब्रेकडाउननुसार थिअरी, प्रॅक्टिकल, प्रोजेक्ट आणि इंटर्नल असेसमेंटमध्ये गुण वितरित केले जाणार आहेत. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी याचे स्वतंत्र ब्रेकडाऊन देखील देण्यात आले आहे. दरम्यान डिसेंबर महिन्यापर्यंत विद्यार्थ्यांना या 10वी, 12वी च्या बोर्ड परीक्षांच्या लेखी परीक्षांचे देखील वेळापत्रक मिळणार आहे. cbse.gov.in या अधिकृत वेबसाईट वर विद्यार्थ्यांना परीक्षा आणि वेळापत्रकाचे पुढील अपडेट्स मिळणार आहेत.
2025 मध्ये, देशभरातील आणि परदेशातील 8,000 शाळांमध्ये सुमारे 44 लाख उमेदवार इयत्ता 10 आणि 12 वीच्या बोर्डाच्या परीक्षेला बसतील. बोर्डाच्या परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान 75 टक्के उपस्थिती राखणे बंधनकारक असल्याचे सीबीएसईने अलीकडेच म्हटले आहे.