
बोर्ड परीक्षा या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या परीक्षा आहेत. पण म्हणून परीक्षांचा काळ हा जणू युद्ध असल्यासारखे मानून त्याचा ताण घेण्याची काहीच गरज नाही. अनेकांना परीक्षांचा ताण येतो आणि त्याचा परिणाम परफॉर्मन्स वर होतो. म्हणून तुमच्या आजुबाजूला यंदा बोर्डाची परीक्षा देणार्यांचं मनोबल उंचावण्यासाठी आणि सकारात्माकता देण्यासाठी त्यांना शुभेच्छा आणि तुमचा पाठिंबा द्यायला विसरू नका.
दहावी, बारावीच्या परीक्षा तणावमुक्त वातावरणामध्ये पार पडाव्या म्हणून अनेक सत्र घेतली जातात. ताण कमी करण्यासाठी मानसोपचाराची मदत घेतली जाऊ शकते.
बोर्ड परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा





महाराष्ट्र बोर्डाच्या यंदाच्या 12वी च्या परीक्षा 11 फेब्रुवारी तर 10वी च्या परीक्षा 21 फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर आता परीक्षेसाठी सज्ज होताना विद्यार्थ्यांचं मनोबल उंचावेल अशी गोष्टींना पाठिंबा द्यायला विसरू नका.