BEL Recruitment 2021: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये ट्रेनी इंजिनियर पदांसाठी नोकर भरतीसाठी एक नोटीस जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार एकूण 40 पदांवर नोकर भरती केली जाणार आहे. ही नोकर भरती एसबीयू, बंगळुरु परिसरात केली जाणार आहे.त्यामुळे या नोकर भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट https://www.bel-india.in येथे फॉर्म भरावा.या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अंतिम तारीख 21 मे आहे. उमेदवारांनी लक्षात ठेवावे की, 21 मे नंतर कोणताही अर्ज स्विकारला जाणार नाही आहे.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिडेटकडून जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशनुसार, ट्रेनी इंजिनियर पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. उमेदवारांना इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन मध्ये बीई, बीटेक आणि डिग्री घेतलेली असावी. या व्यतिरिक्त इंजिनियर पदांच्या नियुक्ती प्रक्रियेसहित अन्य महत्वाची माहिती त्यांना अधिकृत संकेतस्थळावर मिळणार आहे.(खुशखबर! Covid-19 महामारी काळात बँकिंग क्षेत्रातील 'ही' कंपनी देणार 4 हजार भारतीयांना नोकऱ्या)
अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 200 रुपये शुल्क मोजावे लागणार आहेत. तर पीडब्लूडी, एससी आणि एसटी वर्गातील उमेदवारांना अर्जासाठी कोणताही शुल्क भरावा लागणार नाही आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 एप्रिल 2021 पर्यंत 25 वर्षाहून कमी नसावे. तर एससी/एसटी उमेदवारांना वयात सूट दिली जाणार आहे. तसेच पीडब्लूडी संबंधित उमेदावरांना 10 वर्षांची सूट मिळणार आहे. तर या पदासाठी अधिक माहितीसाठी उमेदवारांनी नोटिफिकेशन व्यवस्थितीत वाचावे. (Central Railway Recruitment 2021: सेंट्रेल रेल्वेत सीनियर रेजिडेंटच्या पदासाठी नोकर भरती, 'या' पद्धतीने होईल उमेदवाराची निवड)
तसेच बॉम्बे हायकोर्टात सुद्धा सिनियर सिस्टिम ऑफिसर आणि सिस्टिम ऑफिसर पदासाठी नोकर भरती केली जाणार आहे. या संबंधित अधिकृत वेबसाइट bombayhighcourt.nic.in येथे नोटिस जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार एकूण 40 पदांवर योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. तर पहिल्या आर्थिक आयोगाच्या प्रधान्याअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील जिल्हा आणि तालुका न्यायालयांमध्ये नियुक्ती केली जाणार आहे. ही भरती अनुबंधच्या आधारावर असणार आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी अधिकृत नोटिफिकेशन पहावे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 मे 2021 पर्यंत आहे.