Central Railway Recruitment 2021: सेंट्रेल रेल्वेत सीनियर रेजिडेंटच्या पदासाठी नोकर भरती, 'या' पद्धतीने होईल उमेदवाराची निवड
प्रतिकात्मक फोटो (File Photo)

Central Railway Recruitment 2021:  सेंट्रल रेल्वेत रेजिडेंट, एसआरच्या पदासाठी नोकर भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी एक नोटिफिकेशन सुद्धा जाहीर केले आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड वॉक-इन-इंटरव्युच्या माध्यमातून केली जाणार आहे. येत्या 19 मे रोजी हा इंटरव्यु आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे नोकर भरती संदर्भातील अधिक माहितीसाठी उमेदवारांनी https://cr.indianrailways.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.

या नोकर भरतीसाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त संस्था किंवा केंद्र सरकारकडून मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी येथून पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री/डीएम/डीएनबी किंवा डिप्लोमा केलेला असावा. त्याचसोबत अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 40 वर्ष असावे. बाल रोग पदासाठी 02 पोस्ट आणि जनरल ऑन्कोलॉजीसाठी 01 पोस्टवर निवड केली जाणार आहे.

उमेदवारांनी लक्षात ठेवा की, 19 मे रोजी वॉक-इन-इंटरव्यूसाठी सकाळी 10 वाजता ते 11 वाजेदरम्यान अर्जासह कागदपत्र पाठवावे. त्याचसोबत सेंट्रल रेल्वेनंतर आता पश्चिम रेल्वेत सुद्धा नोकर भरती केली जाणार आहे. त्यानुसार सीएमपी, नर्सिंग सिस्टर, हॉस्पिटल अटेंडेंच्या पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 7 मे पासून होणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 मे 2021 आहे. उमेदवाराची निवड व्हिडिओ इंटरव्यूच्या माध्यमातून केली जाणार आहे. अर्ज करण्यासाठी wr.indianrailways.gov.in  येथे भेट द्यावी. अत्यंत महत्वाचे म्हणजे अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन फॉर्म नीट वाचावा. त्यानंतर उमेदवाराने अर्ज करावे असे सांगण्यात आले आहे.

तसेच साउथ ईस्टर्न रेल्वे कडून 53 विविध पदांसाठी नोकर भरती केली जाणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख मात्र आज आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असल्यास त्यांनी अधिकृत वेबसाइट SER.indianrailways.gov.in येथे भेट द्यावी. आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानुसार स्टाफ नर्स, ड्रेसर, हॉस्पिटल अटेंडेंट आणि हाउसकीपिं असिस्टेंटच्या पदासाठी उमेदावराची निवड केली जाणार आहे.  अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे विविध पदासाठी वेगळे वेगळी शैक्षणिक योग्यतेची अट घालण्यात आली आहे.