Bank Of Maharashtra Recruitment 2021: स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी नोकर भरती, 19 सप्टेंबर पर्यंत करता येईल अर्ज
Bank of Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Bank Of Maharashtra Recruitment 2021: बँक ऑफ महाराष्ट्रात नोकर भरतीसाठी पत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बँकेत स्पेशालिस्ट ऑफिसर पदासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या नोकर भरती अंतर्गत पुणे स्थित मुख्यालय आणि संपूर्ण देशातील विविध शाखेत स्पेशालिस्ट ऑफिसर स्केल 1 आणि 2 पदासाठी भरती केली जाणार आहे. बँकेद्वारे नोकर भरती अनुसार एग्रीकल्चर, सिक्युरिटी, लॉ, एचआर/पर्सोनेल आणि आयटी विभागात स्केल 1 आणि 2 मध्ये विशिष्ट अधिकाऱ्यांच्या एकूण 190 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.(Axis Bank वर RBI ची दंडात्मक कारवाई; 'या' कारणांसाठी ठोठावला 25 लाखांचा दंड)

या नोकर भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना बँकेची अधिकृत वेबसाइट bankofmaharashtra.in वर उपलब्ध असलेल्या अॅप्लिकेशन फॉर्मच्या माध्यमातून अर्ज करता येणार आहे. अर्जासाठी उमेदवारांना वेबसाइटच्या करियर सेक्शन मध्ये नोकर भरती संदर्भातील अधिसूचेसाठी दिलेल्या लिंकच्या माध्यमातून अर्ज करता येईल. अर्ज प्रक्रिया ही 1 सप्टेंबर पासून सुरु झाली असून येत्या 19 सप्टेंबर ही अंतिम तारीख असणार आहे. उमेदवारांना आपला ऑनलाईन अर्ज हा 4 ऑक्टोंबर पर्यंत प्रिंट करता येईल.(NPCIL Recruitment 2021: न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये 107 जागांसाठी भरती, 'असा' करता येईल अर्ज)

बँक ऑफ महाराष्ट्रात स्पेशलिस्ट ऑफिसरच्या नोकर भरतीसाठी विविध पदांसाठी योग्यता वेगळी आहे. एग्रीकल्चर सेक्टरच्या भरतीसाठी उमेदवाराने कृषी/बागकाम/पशुपालन/पशु विज्ञान/डेयरी विज्ञान/मस्त्य विज्ञान/मासे पालन/कृषी मध्ये 4 वर्ष डिग्री घेतलेली असावी. अन्य पदासांठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.