ED Raid: 20 हजार कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; दिल्ली-एनसीआर आणि मुंबई-नागपूरमध्ये छापेमारी
Enforcement Directorate | (File Image)

Money Laundering Case: अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गुरुवारी दिल्ली-एनसीआर (Delhi-NCR), मुंबई आणि नागपूर (Mumbai-Nagpur) मध्ये सुमारे 35 परिसरांची झडती घेतली. ही छापेमारी कंपनी आणि तिच्या प्रवर्तकांविरुद्ध मनी लाँड्रिंगच्या (Money Laundering Case) तपासाचा भाग म्हणून करण्यात आली आहे. प्रवर्तकांवर 20,000 कोटींहून अधिक रुपयांची कथित बँक कर्ज फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, अमटेक ग्रुप आणि त्यांच्या संचालकांवर ईडीचा हा छापा टाकण्यात आला असून त्यात अरविंद धाम, गौतम मल्होत्रा ​​आणि इतरांची नावे आहेत. दिल्ली, गुरुग्राम, नोएडा, मुंबई आणि नागपूर येथील सुमारे 35 व्यावसायिक आणि निवासी परिसरांवर छापे टाकण्यात आले आहेत. आमटेक ग्रुपच्या एसीआयएल लिमिटेड या युनिटच्या विरोधात सीबीआयच्या तपासातून या तपासाला सुरुवात झाली. (हेही वाचा - Jet Airways Money Laundering Case: जेट एअरवेज मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ED ची मोठी कारवाई; जप्त केली 538 कोटी रुपयांची मालमत्ता)

तपासात अनेक सूचीबद्ध कंपन्यांमध्ये 20,000 कोटी रुपयांहून अधिक बँक फसवणूक झाल्याचा आरोप आहे. सुप्रीम कोर्टानेही ईडीच्या चौकशीची मागणी केली होती. ईडीच्या म्हणण्यानुसार, यामुळे सरकारी तिजोरीचे सुमारे 10,000-15,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. (हेही वाचा - Money Laundering Case: पेटीएम पेमेंट्स बँकेला मोठा झटका; Financial Intelligence Unit ने मनी लाँड्रिंग प्रकरणात ठोठावला 5.49 कोटी रुपयांचा दंड)

प्राप्त माहितीनुसार, अधिक कर्ज मिळविण्यासाठी, समूहाने बनावट विक्री, भांडवली मालमत्ता, कर्जदार आणि नफा दाखवला जेणेकरून त्याला अनुत्पादित मालमत्तेचा टॅग मिळू नये. यासोबतच लिस्टेड शेअर्समध्ये हेराफेरी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.