Voting | Twitter

EC Orders Repolling in Betul: लोकसभा निवडणूक(Lok Sabha Election 2024)च्या तिसऱ्या टप्प्यासाठी ७ मे रोजी देशातील काही भागात मतदान झाले. यात मध्य प्रदेश मधील बैतूल जिल्ह्यातही मतदान झाले. बैतूल जिल्ह्यातील ४ बुथवर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडल्यानंतर ईव्हीएम मशिन आणि कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला आग लागली. यामुळे तेथे दुर्घटना घडली. आगीत ईव्हीएम मशिन जळाल्या. मतदान कर्मचाऱ्यांनी बसमधून उड्यामारून आपला जीव वाचवला. त्यामुळे आता त्या ४ बुथवर फेर मतदान पार पडणार (EC Orders Repolling in Betul)आहे. निवडणूक आयोग(Election Commission)ने त्याबाबतचे आदेश दिले आहेत. (हेही वाचा:MP Shocker: ईव्हीएम घेऊन जाणारी बस आगीच्या कचाट्यात; कर्मचाऱ्यांनी उड्या मारून वाचवला जीव)

बूथ २७५- राजापूर, बुथ २७६- दुदर रयत, बुथ २७९- कुंदा रयत आणि बुथ २८०- चिखलीमाळ या ठिकाणच्या ईव्हीएम मशिन जळाल्या. त्यामुळे फेरमतदान होणार आहे. या फेर मतदानासाठी (Revoting Madhya Pradesh) प्रशासनाकडून आवश्यक तयारी करण्यात येणार आहे. बैतूल लोकसभा मतदारसंघातील मुलताई येथील ४ मतदान केंद्रांवर हे फेरमतदान होणार आहे. १० मे रोजी फेरमतदान (Madhya Pradesh Election) पार पडणार आहे.

७ मे रोजीच्या आगीच्या घटनेनंतर बैतूलच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिली होती. आता या प्रकरणी निवडणूक आयोगाने चार मतदान केंद्रांवर फेरमतदानाची अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे मतदारांनी याची नोंद घेणे गरजेचे आहे.