MP Shocker : मध्यप्रदेशमधील बैतूल (Betul) येथे मंगळवारी लोकसभा निवडणूकीसाठी मतदान पार पडलं. मतदानानंतर ईव्हीएम मशीन आणि कर्मचाऱ्यांना घेऊन निघालेल्या बसला अचानक आग (EVM fire in MP) लागली. सुदैवाने आगीत कर्मचारी बचावले. पण, तीन ईव्हीएम (EVM) मशीन जळाल्याची माहिती मिळत आहे. मंगळवारी मध्यरात्री आगीची घटना घडली. आग लागल्याचं कळताच कर्मचाऱ्यांनी जीव वाचवण्यासाठी बसमधून उड्या मारल्या. त्यामुळे जिवीतहानी झाली नाही.मात्र, ईव्हीएम मशीन जळाल्या त्याशिवाय बस देखील जळून खाक झाली आहे. बसला लागलेल्या आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते. (हेही वाचा:Haryana Political Crisis: हरियाणातील भाजप सरकारला झटका; 3 अपक्ष आमदारांनी काढून घेतला पाठिंबा)
काहीवेळात आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. बसमधील ईव्हीएम मशीन बाहेर काढण्यात आल्या. मतदान कर्मचारी आणि ईव्हीएम-व्हीव्हीपीएटी मशीन आणण्यासाठी दुसऱ्या बसची व्यवस्था करण्यात आली. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मध्यप्रदेशमध्ये 66.12 टक्के मतदान झाले होते. विशेष म्हणजे मतदानावेळी कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र, या घटनेमागे राजकीय हात असल्याची चर्चा सध्या परिसरात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात देशातील ९४ लोकसभा मतदारसंघात मंगळवारी मतदान पार पडलं. यामध्ये मध्य प्रदेशातील मुरैना, भिंड, ग्वाल्हेर, गुना, सागर, विदिशा, भोपाळ, राजगढ आणि बैतूल या ९ मतदारसंघाचा देखील समावेश होता. राज्यातील एकूण 29 मतदारसंघांपैकी 12 जागांसाठी 19 आणि 26 एप्रिल रोजी दोन टप्प्यात मतदान झाले. तर, 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यात 9 जागांसाठी मतदान झाले.
बैतूल : EVM और मतदान कर्मियों को लेकर लौट रही बस में लगी आग, हादसे में सभी कर्मचारी सुरक्षित. मतदान सामग्री को आंशिक नुकसान होने की खबर#madhyapradesh #betul #LokSabhaElections2024 #EVM pic.twitter.com/6npuPYEvvW
— NDTV India (@ndtvindia) May 7, 2024