PM Modi's Gift Collection Set For E-Auction (Photo Credit - PIB)

PM Modi's Gift Collection Set For E-Auction: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव (Auction) मंगळवारपासून सुरू होत आहे. हा लिलाव 2 ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधींच्या जयंतीपर्यंत चालणार आहे. पॅरालिम्पिक पदक विजेत्यांचे बूट आणि इतर वस्तूंपासून ते राम मंदिराच्या प्रतिकृती आणि चांदीच्या वीणापर्यंत, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तू आणि स्मृतिचिन्हांचा लिलाव केला जाणार आहे. सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी सोमवारी सांगितले की, लिलावासाठी ठेवल्या जाणाऱ्या या वस्तूंची एकूण मूळ किंमत सुमारे दीड कोटी रुपये असेल.

शेखावत यांनी दिल्लीतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये पंतप्रधानांना मिळालेल्या स्मृतिचिन्हांच्या प्रदर्शनाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या भेटवस्तूंचा लिलाव करण्यासाठी मूळ किंमत सरकारी समितीने ठरवली आहे आणि किंमती किमान 600 रुपये ते कमाल 8.26 लाख रुपये आहेत. आपल्या पंतप्रधानांनी त्यांना मिळालेल्या सर्व भेटवस्तू आणि स्मृतिचिन्हांचा लिलाव करण्याची नवी संस्कृती सुरू केली आहे, असंही यावेळी शेखावत यांनी नमूद केलं. (हेही वाचा -PM Modi Travels On Ahmedabad-Gandhinagar Metro Rail: पंतप्रधान मोदींनी अहमदाबाद-गांधीनगर मेट्रोने केला प्रवास; प्रवाशांशी साधला संवाद (Watch Video))

भेटवस्तूमधून मिळालेला पैसा 'गंगा स्वच्छतेसाठी' वापरला जाणार -

गजेंद्र सिंह शेखावत यांनी सांगितले की, 'पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तू लिलावाद्वारे लोकांना परत केल्या जातात आणि लिलावातून मिळालेला पैसा 'गंगा स्वच्छतेसाठी' वापरला जातो. ही या लिलावाची सहावी वेळ आहे. यातून जमा झालेला निधी राष्ट्रीय गंगा निधीला दान केला जाईल. यावेळी गेल्या वर्षभरात पंतप्रधान मोदींना भेटवस्तू म्हणून मिळालेल्या सुमारे 600 वस्तूंचा लिलाव होणार आहे. pmmementos.gov.in वर जाऊन या भेटवस्तू खरेदी करता येतील. (हेही वाचा - PM e-drive Scheme: मोदी सरकारने PM ई-ड्राइव्ह योजना केली सुरू, पायाभूत सुविधांमध्ये होणार मोठी सुधारणा! (व्हिडिओ पाहा))

पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तू -

ज्या वस्तूंची आधारभूत किंमत सर्वात जास्त ठेवण्यात आली आहे त्यात पॅरालिम्पिक कांस्यपदक विजेते नित्या श्री सिवन आणि सुकांत कदम यांच्या बॅडमिंटन रॅकेट आणि रौप्यपदक विजेता योगेश खातुनियाच्या 'डिस्कस'चा समावेश आहे. त्यांची मूळ किंमत सुमारे 5.50 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. पॅरालिम्पिक कांस्यपदक विजेते अजित सिंग आणि सिमरन शर्मा आणि रौप्य पदक विजेता निषाद कुमार यांनी भेट दिलेल्या शूज व्यतिरिक्त, रौप्य पदक विजेता शरद कुमार यांनी स्वाक्षरी केलेल्या टोपीची मूळ किंमत सुमारे 2.86 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

राम दरबार मूर्तीची किंमत 2.76 लाख रुपये -

5.50 लाख रुपयांची राम मंदिराची प्रतिकृती, 3.30 लाख रुपयांची मोराची मूर्ती, 2.76 लाख रुपयांची राम दरबारची मूर्ती आणि 1.65 लाख रुपयांची चांदीची वीणा, यासह इतर उच्च मूळ किमती आहेत. सर्वात कमी आधारभूत किमतीच्या भेटवस्तूंमध्ये कापूस अंगवस्त्रम, टोपी आणि शाल यांचा समावेश आहे, ज्यांची किंमत 600 रुपये आहे. लिलाव 17 सप्टेंबरला पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाला सुरू होईल आणि 2 ऑक्टोबरला संपेल.