बेंगलुरू येथील डॉक्टरांनी 15 वर्षाच्या मुलीच्या गळ्यातून काढला 3.5 किलोचा ट्यूमर
ऑपरेशन रूम आणि प्रतीकात्मक फोटो (Photo Credits : Pixabay)

बेंगलुरू (Bengaluru) येथील एका रुग्णालयातील डॉक्टरांनी 15 वर्षाच्या मुलीच्या गळ्यातून 3.5 किलोग्रॅमचा धोकादायक ट्यूमर (Tumor) काढला आहे. मुलीच्या गळ्यापासून छातीपर्यंत ताणल्या गेलेल्या या गाठीने मुलीचे आयुष्य गेल्या अनेक दिवसापासून धोक्यात होते. सुरभी यांना झालेल्या या धोकादायक रोगाला डॉक्टरांनी ‘फाइब्रोमेटोसिस’(Fibromatosis) म्हणून ओळखले आहे. एस्टर सीएमआय हॉस्पिटलमधील 21 डॉक्टरांच्या पथकाने तिच्या मानेवर फुटबॉल आकाराचे ट्यूमर काढण्यासाठी शस्त्रक्रिया केली. आता सुरभी सामान्य आयुष्य जगत आहे.

गुजरातच्या अमरेली जिल्ह्यात एका शेतकऱ्याच्या घरात सुरभी बेन यांचा जन्म झाला. त्या जेव्हा लहान होत्या, तेव्हा त्यांच्या आई-वडिलांनी तिच्या चेहऱ्याजवळ छोटी गाठ पाहिली होती. त्यानंतर ही गाठ तिच्या मानेपर्यंत पोहोचली. त्यानंतर सुरभीच्या कुटुंबीयांनी अमरेली जिल्ह्यातील आणि त्याच्या आसपासच्या अनेक डॉक्टरांशी संपर्क साधला. तेथे डॉक्टरांनी सुरभीचा ट्यूमर स्थानिक रुग्णालयात बरा होऊ शकत नसल्याचं सांगितलं. ट्यूमरच्या उपचारासाठी तिला मेट्रो शहरांमधील रुग्णालयात हलविण्याची सूचनादेखील स्थानिक डॉक्टरांनी दिल्या. (वाचा - MP Bus Accident: मध्य प्रदेशात कालव्यात बस पडून अपघाताप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मृतांना 2 लाखांची तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर)

रुग्णालयाने निवेदनात म्हटले आहे की, ही शस्त्रक्रिया आणि इंजेक्शन स्क्लेरोथेरपी खूपच महाग होती. कुटुंबाच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे सुरभीवर उपचार करणं तिच्या कुटुंबियांना खूपचं कठीण होतं. तिची दुर्दशा सांगताना सुरभी म्हणाली की, ट्यूमरमुळे ती कोठेही जाऊ शकली नाही. तसेच एका वर्षापूर्वी गृहपाठ किंवा असाईनमेंट करत असताना तिच्या गळ्यात अचानक वेदना होऊ लागल्या. त्यामुळे सुरभीला शाळा सोडावी लागली.