मध्य प्रदेश बस अपघात (Photo Credits-Twitter)

MP Bus Accident:  मध्य प्रदेशातील सीधी (Sidhi) येथे मोठी धक्कादायक दुर्घटना घडली आहे. येथे रामपूर थाना क्षेत्रात एक बस कालव्यात पडून अपघात झाला असता त्यामध्ये 30 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. असे सांगितले जात आहे की, अपघातावेळी बसमध्ये जवळजवळ 54 प्रवासी होते. याच पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. तसेच अपघातग्रस्तांना मदत सुद्धा जाहीर केली आहे.(Jalgaon Accident Update: जळगाव दुर्घटनेत मृत पावलेल्या 15 जणांच्या कुटूंबियांना मुख्यमंत्र्यांकडून आणि पंतप्रधान मोदींकडून प्रत्येकी 2 लाखांची मदत जाहीर)

पंतप्रधान नॅशनल रिलिफ फंडातून बस अपघातात मृत्यू झालेल्यांना 2 लाखांची मदत तर गंभीर जखमी झालेल्यांना 50 हजार रुपये आर्थिक मदत करणार असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. तर आतापर्यंत 39 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सीधीचे जिल्हाधिकारी रविंद्र कुमार चौधरी यांनी दिली आहे.दरम्यान, अपघातातील 35 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर 54 जण असलेल्या या बसच्या अपघाताप्रकरणी अद्याप शोधकार्य सुरुच आहे. या व्यतिरिक्त 7 जणांचा वाचवण्यात यश आले आहे.(Uttarakhand Tragedy: तपोवन बोगद्यात सलग आठव्या दिवशी बचावकार्य सुरू; आतापर्यंत 41 मृतदेह सापडले, अद्याप 164 जण बेपत्ता)

Tweet:

तर मीडिया रिपोर्ट्सनुसार, रामपुर थाना क्षेत्रातील पटना पुलावरुन सतना येथे जाणारी एक बस जात होती. पण त्यावेळी गाडीवरील ताबा सुटल्याने ती तेथे असलेल्या कालव्यात पडली. या दुर्घटनेनंतर कालव्यात बुडालेल्या नागरिकांचा आवाज ऐकून आजूबाजूची लोक घटनास्थळी दाखल झाले. तर काही प्रवाशांना बाहेर काढत रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले. घटनेची सुचना मिळाल्यानंतर तातडीने आपत्ती व्यवस्थापनाची टीम तेथे पोहचले आणि बचाव कार्य सुरु केले.