Jalgaon Accident Update: जळगाव दुर्घटनेत मृत पावलेल्या 15 जणांच्या कुटूंबियांना मुख्यमंत्र्यांकडून आणि पंतप्रधान मोदींकडून प्रत्येकी 2 लाखांची मदत जाहीर
PM Modi, CM Thackeray and Jalgaon Accident (Photo Credits: PTI/Twitter)

जळगाव मध्ये ट्रक पलटी होऊन झालेल्या भीषण अपघाताने (Jalgaon Accident Update) संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला आहे. यात अपघात इतका गंभीर होता की यात जागीच 15 जणांचा मृत्यू झाला. यात 2 चिमुकल्यांचाही समावेश आहे. तसेच काही कामगार महिला आणि पुरुषांचा समावेश आहे. या घटनेत 2 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पीएम मोदी फंड्समधून (PM Relief Funds) तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री सहाय्यक निधीतून (CM Relief Funds) मृतांच्या कुटूंबियांना प्रत्येकी 2 लाखांची मदत जाहीर केली आहे.

पीएम मोदी सहाय्य निधीतून जळगाव दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या 15 जणांच्या कुटूंबियांना प्रत्येकी 2 लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.हेदेखील वाचा- जळगाव येथील भीषण दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदीं सह राष्ट्रपतींनी ट्विटद्वारे व्यक्त केला शोक, See Tweets

तर दुसरीकडे या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या 15 मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केले. मुख्यमंत्री कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान "जळगाव दुर्घनेतील मृतांबाबत ट्विटच्या माध्यमातून व्यक्त दु:ख केले. मृतांच्या कुटुंबियांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या असून जखमी व्यक्ती लवकर बऱ्या होतील" अशी भावना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.