PM Modi, President Ramnath Kovind And Jalgaon Accident (Photo Credits: Facebook/Twitter)

महाराष्ट्रातील जळगाव (Jalgaon) येथे काल रात्री घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon Accident) यावल तालुक्यातील किनगावजवळ ट्रक पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात 15 जणांचा जागीच मृत्यू झाला. यात दन चिमुकल्यांचाही समावेश आहे. तसेच यात 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेची बातमी मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांनी ट्विटच्या माध्यमातून शोक व्यक्त केला. हा अपघात हृदय हेलावून टाकणारा आहे अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे.

"महाराष्ट्रातील जळगाव येथे हृदय हेलावून टाकणारा ट्रकचा अपघात घडला आहे. शोकाकुल कुटुंबांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो" असे पंतप्रधान मोदी ट्विटमध्ये म्हणाले आहेत.हेदेखील वाचा- महाराष्ट्र: जळगाव जिल्ह्यातील किनगावाजवळ भीषण अपघात, ट्रक पलटी होऊन 15 जणांचा मृत्यू, 2 जण जखमी

तर "जळगाव दुर्घनेतील मृतांबाबत ट्विटच्या माध्यमातून व्यक्त दु:ख केले. मृतांच्या कुटुंबियांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या असून जखमी व्यक्ती लवकर बऱ्या होतील" अशी भावना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा ट्रक धुळे येथून चोपडा मार्गे रावेरला जात होता. मध्यरात्रीच्या सुमारास हा ट्रक पलटी झाला. यात 15 जण जागीच ठार झाले असून 2 जण जखमी आहे. मृतांमध्ये 2 चिमुकल्यांचाही समावेश आहे.