Baba Ka Dhaba चे मालिक Kanta Prasad यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; कशासाठी केला होता आत्महत्येचा प्रयत्न? माहिती आली समोर
Kanta Prasad (Photo Credits: ANI)

Baba Ka Dhaba Owner Discharged From Hospital: दक्षिण दिल्लीतील 'बाबा का ढाबा' (Baba Ka Dhaba) चे मालक कांता प्रसाद (Kanta Prasad) यांना सफदरजंग रुग्णालयामधून (Safdarjung Hospital) डिस्चार्ज मिळाला आहे. त्यांनी 17 जून रोजी अल्कोहोलमध्ये झोपेच्या गोळ्या मिसळून प्यायले होते. ज्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कांता प्रसाद हे रुग्णालयातून घरी परतले असून सध्या आराम करत आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त अतुल कुमार यांनी दिली आहे. कांता प्रसाद यांनी आत्महत्येच्या प्रयत्नाने सर्वांना हादरून सोडले होते. तसेच त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला? असाही प्रश्न अनेकांना पडला होता.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कांता प्रसाद यांना अनेक लोक फोन करून युट्युबर गौरव वासन यांची माफी मागण्यास सांगत होते. ज्यामुळे कांता प्रसाद नैराश्यात गेले होते. यातूनच त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. रुग्णालयातून घरी परतल्यानंतर कांता प्रसाद म्हणाले की, मला गुरूवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच माझी इच्छा आहे की, वासनने नेहमी आनंदात राहावे आणि मला माझ्या पद्धतीने जगू द्या. हे देखील वाचा- Covid-19 च्या दुसऱ्या लाटेमुळे Indian Economy ला झटका; Moody's ने घटवला GDP वाढीचा अंदाज

दरम्यान, वासन पीटीआयशी बोलताना म्हणाले की, प्रसाद यांना कोण फोन करीत आहे? हे मला माहिती नाही. तसेच कोण लोक त्यांना फोन करून माझी माफी मागण्यास दबाव टाकत आहे? याचीही मला काही कल्पना नाही. त्यांनी मीडियासमोर माझी मागितली होती. त्यानंतर मी त्यांना भेटायला गेला होतो. त्यावेळी त्यांनी खेद व्यक्त केला. पण मला वाईट वाटले. ते मोठे आहेत आणि त्यांनी असे नव्हत करायला पाहिजे.