LK Advani Hospitalised: भाजप ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी AIIMS रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर
Photo Credit - X

LK Advani Hospitalised: भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना दिल्लीच्या एम्स (AIIMS) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 96 वर्षांच्या आडवाणी यांच्यावर उपचार सुरू असून आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

तीन महिन्यापूर्वी लालकृष्ण अडवाणी यांचा केंद्र सरकारने भारत रत्न या भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या घरी जाऊन हा पुरस्कार प्रदान केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उप राष्ट्रपती जगदीप धनकड, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थित त्यांना भारत रत्न देण्यात आला होता.

पोस्ट पहा

लालकृष्ण अडवाणी यांनी जून 2002 ते मे 2004या काळात देशाचे उपपंतप्रधान म्हणून काम पाहिले आहे. तसेच ऑक्टोबर 1999ते मे 2004 या काळात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री म्हणूनही काम पाहिले होते. 1986 ते 1990, 1993ते 1998, 2004ते 2005असे तीन वेळा त्यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषविले होते. त्यामुळे त्यांचे भाजप पक्ष संघटनेतही मोठे योगदान आहे.