पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याच्या धमकीचा दिल्ली पोलीस आयुक्तांना ईमेल
पंतप्रधान नरेंद्र मोदी (संग्रहित आणि संपादित प्रतिमा)

दिल्लीतील पोलीस आयुक्तांना आलेल्या ईमेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हा मेल कोणी, कोठून पाठवला याबाबत अद्याप कोणतीही माहिती पुढे आली नाही. मेलचे गांभीर्य पाहून पोलीस आणि तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्यांनी तपास सुरु केला आहे. या वृत्तामुळे मोदींच्या जीविताला धोका असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान, पूर्वेकडील राज्यांमधून हा मेल आला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तपस यंत्रणांनी मेल पाठविणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध सुरु केला आहे. हा शोध तपास यंत्रणांच्या वरिष्ठ पातळीवरुन घेतला जात आहे. तपास यंत्रणा मेल पाठवणाऱ्या अज्ञात व्यक्तिपर्यंत लवकरच पोहोचेल अशी आशा आहे. (हेही वाचा, राफेल डील: काहीच उरले नाही, आता काय लपवणार? चेटूकगिरी करुनही भूत उतरणार नाही: उद्धव ठाकरे)

दरम्यान, माओवाद्यांकडूनही काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी आली होती.