Delhi Accident: दिल्लीत एक भयंकर अपघात झाल्याचे व्हिडिओ समोर येत आहे. दिल्ली शहरातील शालीमार बाग परिसरात एक भरधाव कार गॅस सिलिंडरने भरलेल्या रिक्षावर आदळते. ही घटना संपुर्ण सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे एक अनियंत्रित कार भरधाव वेगात येते आणि थेट गॅस सिलिंडरने भरलेल्या रिक्षावर आदळते. या अपघातात काही जण जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. कारने धडक दिल्याने सिलिंडर हवेत फेकले गेले. सुदैवाने, या आघातानंतर सिलिंडरचा स्फोट झाला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, शालिमार बागेत ही घटना सोमवारी घडली. धक्कादायक म्हणजे ही कार अल्पवयीन मुलगा चालवत असल्याची माहिती मिळत आहे. अपघातात अनेक लोक गंभीर जखमी झाले आहे. स्थानिकांच्या मदतीने जखमी लोकांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. सद्या त्यांच्यावर रुग्णालायत उपचार सुरु आहे. (हेही वाचा- परभणीत ट्रॅक्टर आणि क्रुझरच्या धडकेत भीषण अपघात;)
#WATCH दिल्ली: शालीमार बाग इलाके में एक तेज रफ्तार कार ने गाड़ी चालक को टक्कर मार दी, घायल को अस्पताल ले जाया गया।
(CCTV वीडियो सोर्स: दिल्ली पुलिस) pic.twitter.com/ozYJD3lB0p
— ANI_HindiNews (@AHindinews) December 18, 2023
शालिमार बाग येथे रिक्षाला धडकण्यापूर्वी कार चालवणाऱ्या तरुणाने एका 6 वर्षीय मुलीला आणि तिच्या आईला धडक दिली. आई-मुलीच्या दोघांना धडकल्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात चालकाने कार वेगात नेली आणि सिलिंडरने भरलेल्या रिक्षाला धडक दिली. घटनास्थळी उपस्थित लोकांनी चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी कार चालकावर गुन्हा दाखल करून घेतला आहे.