Parbhani Accident: परभणीत ट्रॅक्टर आणि क्रुझरच्या धडकेत भीषण अपघात; 6 जखमी,तिघांचा दुर्दैवी मृत्यू
परभणीच्या यशवाडी येथील मारुतीच्या दर्शनासाठी आलेल्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे.
Parbhani Accident: महाराष्ट्रात नागपुर शहरात काल वऱ्हाडींच्या वाहनाचा अपघात झाला होता, एकाच गावातील सहा जणांचा या अपघातात मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना परभणीच्या यशवाडी येथील मारुतीच्या दर्शनासाठी आलेल्या वाहनाचा भीषण अपघात (Accident) झाला आहे. हे भाविक परतुर येथून आले होते. क्रुझर गाडीचा आणि ट्रॅक्टरच्या धडकेत अपघात झाला आहे, या अपघातात सहा जण जखमी झाले असून तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच, पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमींना स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात पाठवण्यात आले. (हेही वाचा-नागपूरमधील पांचपावली पुलावर अपघात, टेम्पोची दुचाकीला धडक, )
मिळालेल्या माहितीनुसार, परभणीच्या यशवाडी येथील मारुतीच्या दर्शनासाठी आले होते. क्रुझर गाडीत ९ जण हे जालना जिल्ह्यातील परतुर येथील ब्राह्मण वाडीतील रहिवासी आहे.दर्शन झाल्यानंतर घरी परतत असताना पाथरी तालुक्यातील वडीपाटीजवळ ट्रॅक्टर आणि क्रुझरची जोरदार धडक झाली आणि अपघात घडला. या अपघातात अमोर मारुती सोळंके, अण्णासाहेब हरिभाऊ सोळंके, दिगंबर भिकाजी कदम यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच, पोलिस अपघातस्थळी दाखल झाले.धडक इतक्या जोरात होती की, क्रुझरचा समोरचा भाग ट्रॅक्टरमध्ये अडकला होता. त्यामुळे अडकलेल्या क्रुझरला बाहेर काढण्यासाठी जेसीबी मागवावी लागली.
तसेच, कृष्णा सखाराम सोळंके, उमेश भारत सोळंके, संतोष कुंडलिक पांचाळ, अविनाश चंदू पाटील सोळंके, दशरथ सुदामराव, किशोर सोळंके हे 6 जण या अपघातात जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. मृत भाविकांचे मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Dec 17, 2023 11:14 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

