Odisha Health Minister Naba Das Dies: ओडिशाचे आरोग्य मंत्री नबा दास (Naba Das) यांचा मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारी त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला. ब्रजराजनगर येथील गांधी चौकात एका कार्यक्रमादरम्यान त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यानंतर नबा दास यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. नबा दास यांच्या छातीवर गोळी लागली होती. तत्पूर्वी, ब्रजराजनगर एसडीपीओ गुप्तेश्वर भोई यांनी सांगितले होते की, सहायक पोलिस उपनिरीक्षक (एएसआय) गोपाल दास यांनी मंत्र्यावर गोळीबार केला होता. या घटनेत मंत्री जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. स्थानिक लोकांनी आरोपी एएसआयला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. एएसआयने मंत्र्यावर गोळीबार का केला? याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
SDPO च्या म्हणण्यानुसार, ब्रजराजनगर शहरात दुपारी 1 च्या सुमारास ही घटना घडली. जेव्हा दास एका बैठकीला जात होते. मंत्र्याला प्रथम झारसुगुडा जिल्हा मुख्यालय रुग्णालयात नेण्यात आले, परंतु नंतर त्यांना चांगल्या उपचारांसाठी भुवनेश्वर येथील रुग्णालयात विमानाने नेण्याची व्यवस्था करण्यात आली. दास यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर शहरात तणावाचे वातावरण होते. मंत्र्यांच्या समर्थकांनी त्यांच्या सुरक्षेतील त्रुटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. (हेही वाचा - Odisha Health Minister Naba Das Shot: ओडिसाचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री नबा दास यांच्यावर गोळीबार; उपचारासाठी रुग्णालयात दाखल)
दास यांना लक्ष्य करण्याचा कट असल्याचा आरोप काही समर्थकांनी केला. एसडीपीओने सांगितले की, आरोपी एएसआयला अटक करण्यात आली आहे. त्याची चौकशी सुरू आहे. घटनेची सखोल चौकशी केल्यानंतरच अधिक माहिती समोर येईल.नबा दास यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले, जेथे त्यांची प्रकृती चिंताजनक होती. दरम्यान मंत्री नबा दास यांना विमानाने भुवनेश्वरला नेण्यात आले. आरोग्यमंत्र्यांवर झालेल्या हल्ल्याची माहिती मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना देण्यात आली. दास यांना भेटण्यासाठी ते भुवनेश्वरमधील अपोलो हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. नबा दास हे बीजेडीचे ज्येष्ठ नेते होते. अलीकडेच ते शनि मंदिरात 1.7 किलो सोन्याचा कलश अर्पण केल्याने प्रसिद्धीझोतात आले होते.
Odisha Health Minister Naba Das, who was shot at, succumbs to bullet injuries
Read @ANI Story | https://t.co/NznBxUqhK7#Odisha #OdishaHealthMinister #NabaDas pic.twitter.com/Fhl4rR0aMI
— ANI Digital (@ani_digital) January 29, 2023
तथापी, या हल्ल्यानंतर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे वक्तव्य समोर आले आहे. या हल्ल्याच्या दुर्दैवी घटनेने मला धक्का बसला आहे, असे ते म्हणाले. याचा मी तीव्र निषेध करतो. या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश गुन्हे शाखेला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाण्यास सांगण्यात आले आहे.