Odisha Health Minister Naba Das Shot: ओडिसाचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आणि झारसुगुडाचे आमदार नबा किशोर दास (Naba Kishore Das) यांच्यावर रविवारी ब्रजराजनगरमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना ब्रजराजनगर येथील गांधी चौकात दुपारी 12.15 च्या सुमारास घडली. त्याच्या छातीत गोळी लागली आहे. दास यांना स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. ते ब्रजराजनगरमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. दास ब्रजराजनगर येथे एका जाहीर सभेला जात असताना त्यांच्यावर किमान चार ते पाच राऊंड गोळीबार करण्यात आल्याचे वृत्त आहे.
#BREAKING : Health and Family Welfare Minister Naba Das shot at in Brajarajnagar, admitted to hospital. He was apparently fired at from close range @NewIndianXpress @XpressOdisha @santwana99
— Siba Mohanty (@Siba_TNIE) January 29, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)