Up Tiger Attack Video: उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्यात वाघाची दहशत पसरली आहे. सोमवारी एका तरुणावर जंगली वाघाने हल्ला केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शेतात शौच करत असताना वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात पीडित गंभीर जखमी झाला आहे. सद्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (हेही वाचा- जबलपूर-मुंबई ट्रेनच्या एसी कोचमध्ये दिसला विषारी साप; प्रवाशांमध्ये घबराट, व्हिडिओ व्हायरल (Watch)
मिळालेल्या माहितीनुसार, पिलीभीत जिल्ह्यातील नागरिया कट भागात एका वाघाने तरुणावर हल्ला केला. या हल्ल्यात पीडितेला गंभीर दुखापत झाली आहे. तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला स्थानिकांनी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. या हल्ल्यामुळे गावात घबराट निर्माण झाली आहे. तरुणावर हल्ला करत असताना एकाने ही घटना फोनमध्ये रेकॉर्ड केली.
तरुण सकाळी शौच करण्यासाठी शेताच्या झुडपात गेला होता. त्यावेळीस अचानक एका जंगली वाघाने त्याच्यावर हल्ला केला. वाघाची डरकाळी ऐकताच गावकऱ्यांना घाम सुटला. गावकरी जीव वाचवण्यासाठी पळू लागले. एकाने या घटनेचा व्हिडिओ फोनमध्ये कैद केला. गावकरी रस्त्यावर पळू लागले. या गोंधळात अनेकजण रस्त्यावर पडले. तर काही जण जखमी झाले.
वाघाचा तरुणावर हल्ला
पीलीभीत
➡शौच के लिए गए ग्रामीण पर बाघ ने किया हमला
➡बाघ के हमले में ग्रामीण बुरी तरह से हुआ लहूलुहान
➡हमले के बाद ग्रामीणों की भीड़ ने बाघ की घेराबंदी की
➡बाघ को देख भीड़ में मची भगदड़ सड़क पर गिरे लोग
➡हमले के बाद डैम किनारे झाड़ियों में डेरा जमाकर बैठा बाघ
➡सूचना के बाद… pic.twitter.com/cviT5keaI4
— भारत समाचार | Bharat Samachar (@bstvlive) September 23, 2024
या घटनेची माहिती वन अधिकाऱ्यांना देण्यात आली. वन अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी मदतकार्य सुरु केले. वाघाच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. त्याला जवळच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले. वनविभाग आणि पोलीस पथक पुढील कारवाई करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून गावात वाघाने दहशत पसरवली आहे. त्यामुळे गावकरी घाबरून आहेत.