Snake on Garib Rath Express: जबलपूर-मुंबई गरीब रथ एक्स्प्रेसमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महाराष्ट्रातील कसारा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेच्या एसी डब्यात एक धोकादायक विषारी साप रेंगाळताना दिसला. साप दिसताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली. सुदैवाने एकाही प्रवाशाला साप चावला नाही. इंटरनेटवर याचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. माहितीनुसार, 12187 जबलपूर-मुंबई गरीब रथ ट्रेनच्या G-17 कोचमधील सीट क्रमांक 23 जवळ हा साप दिसला होता. व्हिडीओमध्ये साप ट्रेनच्या छतावर जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. साप दिसल्यानंतर घाबरून ट्रेनमधील प्रवाशांनी आपली जागा सोडली. त्यानंतर प्रवाशांनी तात्काळ याची माहिती रेल्वे कर्मचाऱ्यांना दिली. त्यानंतर सापाला सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. सर्व प्रवाशांना दुसऱ्या कोचमध्ये पाठवून G-17 कोच लॉक करण्यात आला. यानंतर रेल्वेने संबंधित डबा हटवून दुसरा डबा बसवला.
गरीब रथ एक्स्प्रेसमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमधील चिंता वाढली आहे. भारतीय रेल्वेमध्ये अशा घटना फार कमी घडत असल्या तरी, जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती उद्भवते तेव्हा प्रवाशांच्या सुरक्षिततेचे आणि सतर्कतेचे आव्हान समोर येते. (हेही वाचा: Snake in Toilet: टॉयलेटच्या कमोडमधून आला सापाचा आवाज, सर्पमित्राने बाहेर काढला 10 फुटांचा साप, पाहा व्हिडिओ)
जबलपूर-मुंबई ट्रेनच्या एसी कोचमध्ये दिसला विषारी साप-
Snake in train! Snake in AC G17 coach of 12187 Jabalpur-Mumbai Garib Rath Express train. Passengers sent to another coach and G17 locked. pic.twitter.com/VYrtDNgIIY
— Rajendra B. Aklekar (@rajtoday) September 22, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)