Cow Science Exam 2021: राष्ट्रीय कामधेनु आयोगाकडून 25 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय पातळीवर ऑनलाईन 'कामधेनु गौ विज्ञान प्रचार प्रसार परीक्षे'चे आयोजन
Cow (Photo Credits: (Pixabay) Representational Image Only

Cow Science Exam 2021: राष्ट्रीय कामधेनु आयोग (RKA), गोवंश कल्याण संस्थेच्या सरकारी संस्थेने 25 फेब्रुवारी रोजी 'गौ विज्ञान' (Cow Science) वर देशभरात ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे. या परीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. कामधेनु गौ विज्ञान प्रचार प्रसार परीक्षा दरवर्षी घेण्यात येईल, असं आरकेएचे अध्यक्ष वल्लभभाई कथिरीया यांनी सांगितलं आहे. कथिरीया यांनी यासंदर्भातील पत्रकार परिषदेत सांगितलं की, आम्ही 25 फेब्रुवारी 2021 पासून राष्ट्रीय पातळीवर 'कामधेनु गौ विज्ञान प्रचार प्रसार परीक्षा' सुरू करीत आहोत. गाय विज्ञानाने परिपूर्ण आहे. ज्याचा शोध घेण्याची गरज आहे. देशातील 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थांमध्ये गायीची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. हिंदी व इंग्रजी व्यतिरिक्त 12 प्रादेशिक भाषांमध्ये ही परीक्षा घेण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

कामधेनु गौ विज्ञान प्रचार प्रसार परीक्षा ही हिंदी, इंग्रजी आणि 12 प्रादेशिक भाषांमध्ये 100 बहु-निवडक प्रश्नांची ऑनलाइन परीक्षा असेल. या परीक्षेचा कालावधी एक तासाचा असेल. आर.के.ए. च्या मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या अधिकृत प्रसिद्धीनुसार ही परीक्षा 8th वी पर्यंत प्राथमिक पातळी, इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंतच्या माध्यमिक स्तरावर, महाविद्यालयीन स्तर आणि 12 वी + सामान्य लोकांसाठी अशा चार श्रेणींमध्ये घेण्यात येईल. (वाचा -Indian Army Recruitment 2021: भारतीय सेनेत एनसीसी स्पेशल एन्ट्री मध्ये 55 रिक्त, 28 जानेवारी पर्यंत करता येईल अर्ज)

मंत्रालयाने म्हटले आहे की, या परीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. या परीक्षेचा अभ्यासक्रम तसेच गायींवरील इतर साहित्य व संदर्भ पुस्तके उमेदवारांना राष्ट्रीय कामधेनुयोगाच्या वेबसाइटवर सूचविले जातील. ही पुस्तके परीक्षार्थींना परीक्षेची तयारी करण्यास मदत करतील. दरम्यान, ब्लॉग, व्हिडिओ आणि इतर निवडक वाचनाची सामग्री अधिकृत वेबसाइटवर अपलोड केली जाईल. वैज्ञानिक, उद्योजक, गौसेवक, शेतकरी, युवक आणि महिला तसेच ज्येष्ठ नागरिक या मेगा कार्यक्रमास भव्य यश मिळविण्यासाठी सक्रियपणे कार्य करतील, असंही मंत्रालयाने म्हटलं आहे.

पारदर्शक आणि निःपक्षपाती पद्धतीने ही परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेचा निकाल आरकेएच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येतील. या परीक्षेला बसणाऱ्या सर्वांना प्रमाणपत्र दिले जाईल. यशस्वी गुणवंत उमेदवारांना बक्षिसे व प्रमाणपत्र दिले जाईल. त्यानंतर या परीक्षेचे आयोजन करण्यात मदत करणाऱ्या सर्वांना प्रमाणपत्र दिले जातील. आरकेए मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या अंतर्गत येते. केंद्राने फेब्रुवारी 2019 मध्ये याची स्थापना केली होती. गायींचे संरक्षण, संवर्धन हे या संस्थेचे उद्दिष्ट्य आहे.