MP Couple Brutally Thrashed: डेटवर गेलेल्या जोडप्यांना रंगेहात पकडलं, कुटुंबासह गावकऱ्यांकडून बेदम मारहाण, ग्वाल्हेर येथील घटना
couple-brutally-thrashed MP PC TWIITTER

MP Couple Brutally Thrashed: मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे एका जोडप्याला मुलीच्या कुटुंबीयांनी बेदम मारहाण केली. प्रियकरासोबत डेटवर गेलेली असताना कुटुंबानी तिला रंगेहात पकडले होते. त्यानंतर दोघांना दोरीने बांधून बेदम मारहाण केली. ही घटना भितरवार पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या देवगड गावात घडली आहे. एकाने मारहाण करत असल्याचा व्हिडिओ फोनमध्ये कैद केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा- धावत्या रेल्वे समोर तरुणीने मारली उडी, भयावह घटना CCTV कैद, आग्रा येथील घटना)

मिळालेल्या माहितीनुसार, जोडपे डेटवर गेले असताना तरुणीच्या कुटुंबियांनी त्यांना रंगेहात पकडले. दोघांना कुटुंबियांनी आणि गावकऱ्यांनी पकडून बेदम मारहाण केली. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एकाच दोरीने जोडप्याला बांधून ठेवले आहे. एकीकडे मुलगी आणि दुसऱ्या बाजूला मुलाला बांधले आहे. दोघांना अमानुष मारहाण करत असल्याचा व्हिडिओ दिसत आहे. या घटनेनंतर दोघांच्या गावात खळबळ उडाली आहे.

पीडित तरुणाला जमिनीवर ओढून लाथा आणि बुक्कीने मारहाण करत आहे. पीडित तरुणीनी मदतीसाठी ओरडत आहे. सोना बाथम असं पीडित तरुणाचे नाव आहे. तो मोहनगढ येथील रहिवासी आहे. त्याची प्रियसी ही देवगड येथील रहिवासी आहे. या भीषण घटनेनंतर तरुणाचे कुटुंबानी भितरवार पोलिस ठाण्यात गेले. मात्र पोलिसांनी या प्रकरणाकडे कोणतीही कारवाई केली नाही. यानंतर ग्वाल्हेर रेंजचे आयजी अरविंद सक्सेना यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, अधिकाऱ्यांकडून या घटनेचा आढावा घेतला जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल.