राष्ट्रीय महामार्गावर येत्या 20 एप्रिल पासून टोल वसूली करण्यात येणार
Toll Plaza (Image: PTI)

देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने सरकारने लॉकडाउनचे आदेश 3 मे पर्यंत कायम ठेवले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवासुविधा नेहमीप्रमाणाचे सुरु राहणार आहेत. मात्र दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाउनचे नियम अधिक कठोर करण्यात आले आहेत. परंतु येत्या 20 एप्रिल नंतर काही ठिकाणची परिस्थिती पाहून काही सुविधा नागरिसांठी सुरु करण्यात येणार आहे. मात्र या सुविधांसाठी सुद्धा काही नियम लागू केले जाणार आहेत. याच पार्श्वभुमीवर आता टोल वसूली येत्या 20 एप्रिल पासून राष्ट्रीय महामार्गावर सुरु करण्यात येणार आहे. मात्र वाहतूक उद्योगाशी संबंधित वर्गाकडून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

राष्ट्रीय महामार्गावर 25 मार्च पासून टोल वसूली बंद करण्यात आली आहे. या दरम्यान अत्यावश्यक सेवासुविधांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना दिलासा मिळाला होता. मात्र 20 एप्रिल पासून टोल वसूली पुन्हा केली जाणार आहे. रस्ते परिवहन मंत्रालयाकडून एनएचआय यांना एक पत्र लिहिले आहे. तर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून ट्रक आणि मालवाह वाहनांच्या आंतरराज्यीय वाहतूकीसाठी परवानगी दिली आहे. टोल वसूली पुन्हा सुरु केल्यास आर्थिक महसूल मिळण्यास मदत होईल असे कारण सुद्धा देण्यात आले आहे.(Coronavirus Outbreak in India: भारतात एकूण 14,378 कोरोना बाधित तर 480 रुग्णांचा मृत्यू) 

दरम्यान, सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार, महाराष्ट्रात कोरोनाच्या नॉन-हॉटस्पॉट ठिकाणी येत्या 20 एप्रिल पासून आरोग्य, शेती आणि बागकाम, नारळ, काजू आणि मसाल्याची शेती, पशुसंवर्धन शेती, बँकेच्या शाखा, एटीएम, ई-कॉमर्स कंपन्या सुरु होणार आहेत. मात्र या सेवा सुरु करण्यासाठी काही नियम सुद्धा असणार असून जर त्याच्या गैरफायदा घेतला जात असल्यास त्या गोष्टी पुन्हा बंद करण्यात येतील असे ही सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.