भारतातील कोरना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आघडेवारीनुसार भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा हा आता एकूण 1,51,767 इतका झाला आहे. यात उपचार सुरु असलेल्या 83004 रुग्ण आणि उपचार घेऊन बरे झाल्याने रुग्णालयातून सुटी (डिस्चार्ज) देण्यात आलेल्या 64425 जणांचाही समावेश आहे. यासोबतच आतापर्यंत 4337 कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हा आकडाही एकूण आकडेवारीत (1,51,767 ) समाविष्ट आहे.
भारतात गेल्या 24 तासात कोरना व्हायरस संक्रमित 6387 नवे रुग्ण आढलले. तर, 170 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, गेल्या 24 तासात एकूण किती रुग्ण बरे झाले व त्यांना डिस्चार्ज देण्यात आला याबाबत माहिती प्राप्त नाही.
देशभरात वाढणारा कोरोना व्हायरस संसर्गाता प्रादुर्भाव मोठी चिंता निर्माण करणार आहे. कोरोना व्हायरस संसर्ग टाळला जावा. त्यासोबतच कोरोना व्हायरस गुणाकाराची श्रृंखला तुटावी यासाठी मोठे प्रयत्न होत आहेत. या प्रयत्नाचा पहिला आणि सर्वात मोठा भाग म्हणजे लॉकडाऊन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊन लागू केला. रात्री आठ वाजता पंतप्रधान लाईव्ह आले आणि त्यांनी रात्री बारा वाजलेपासून देश लॉकडाऊन होत असल्याचे सांगितले. त्यामुळे जनतेला लॉकडाऊनला सामोरे जाण्यासाठी केवळ 3 तास मिळाले. (हेही वाचा, Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना व्हायरसच्या 1002 नव्या रुग्णांची नोंद; शहरातील एकूण संक्रमितांची संख्या 32,791 वर)
एएनआय ट्विट
Spike of 6387 new COVID19 cases & 170 deaths in the last 24 hours. Total number of cases in the country now at 1,51,767 including 83004 active cases, 64425 cured/discharged and 4337 deaths: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/wWyo78g4pC
— ANI (@ANI) May 27, 2020
दरम्यान, कोरोना व्हायरस नियंणासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला. परंतू, दिवसेंदिवस वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या पाहता लॉकडाऊन पूर्णपणे अयशस्वी झाल्याचा आरोप आता मोदी सरकारवर होऊ लागला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही घेतलेल्या पत्रकार परिषदेत असा आरोप केला आहे.