Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना व्हायरसच्या 1002 नव्या रुग्णांची नोंद; शहरातील एकूण संक्रमितांची संख्या 32,791 वर
Coronavirus in India (Photo Credits: IANS)

मुंबईच्या कोरोना व्हायरस (Mumbai Coronavirus) संक्रमित रुग्णांमध्ये गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आज थोडी घट झाली, मात्र ही संख्या 1 हजाराच्या पुढे आहे. मुंबईत आज 1002 नवीन कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्णांची आणि 39 मृत्यूची नोंद झाली आहे. अशाप्रकारे एकूण सकारात्मक प्रकरणे वाढून 32,791, तर मृत्यूची संख्या 1065 झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) याबाबत माहिती दिली. आज 26 मे रोजी संध्याकाळी 6 पर्यंत एकूण 866 संशयीत रुग्ण भर्ती झाले आहेत. आज या आजाराचे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 410 इतकी आहे व शहरात आतापर्यंत 8814 रुग्ण बरे झाले आहेत.

एएनआय ट्वीट -

आज मृत्यू पावलेल्या 39 रुग्णांपैकी 25 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील 28 रुग्ण पुरुष व 11 रुग्ण महिला आहेत. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 4 रुग्णांचे वय 40 वर्षाखाली आहे व 12 रुग्णांचे वय 60 च्या वरील आहे. उर्वरित 23 रुग्ण 40 ते 60 वर्षादरम्यानचे आहेत. मुंबईमध्ये धारावी झोपडपट्टी हा एक महत्वाचा हॉटस्पॉट आहे. धारावीमध्ये आज 38 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, अशाप्रकारे धारावीतील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1621 वर पोहोचली आहे. तसेच धारावीत आतापर्यंत 60 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (हेही वाचा: महाराष्ट्रात एकूण 54 हजार 758 कोरोनाबाधित; राज्यात आज 2 हजार 91 रुग्णांची नोंद तर, 97 लोकांचा मृत्यू)

बीएमसीने काही प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली आहे, त्यानुसार-सध्या सक्रिय कंटेनमेंट झोन (झोपडपट्ट्या आणि चाळी) 686 इतके आहेत. सक्रिय सीलबंद इमारती 2826 इतक्या आहेत. एकूण 380 तपासणी शिबिरांचे आयोजन केले गेले आहे व तपासणी शिविरात तपासले गेलेल्या रुग्णांची संख्या 22515 इतकी आहे. महाराष्ट्राबद्दल बोलायचे झाले तर, राज्यात आज 2,091 नव्या रुग्णांची भर पडली आहे व 97 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 54,758 वर पोहचली आहे. यापैकी 16,954 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.