Coronavirus In Maharashtra Update: महाराष्ट्रात एकूण 54 हजार 758 कोरोनाबाधित; राज्यात आज 2 हजार 91 रुग्णांची नोंद तर, 97 लोकांचा मृत्यू

महाराष्ट्रासह (Maharashtra) संपूर्ण देशात कोरोना विषाणूने (Coronavirus) धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अधिक वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

Coronavirus In Maharashtra Update: महाराष्ट्रात एकूण 54 हजार 758 कोरोनाबाधित; राज्यात आज 2 हजार 91 रुग्णांची नोंद तर, 97 लोकांचा मृत्यू
Coronavirus (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रासह (Maharashtra) संपूर्ण देशात कोरोना विषाणूने (Coronavirus) धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अधिक वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पाऊले उचलली जात आहेत. भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज 2 हजार 91 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर, 97 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 54 हजार 758 वर पोहचली आहे. यापैकी 16 हजार 954 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा एकदा वाढवण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात चौथ्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. तसेच लॉकडाउनचा चौथा टप्पा 31 मेपर्यंत कायम ठेवण्यात आला आहे. सध्या भारतात एकूण 1 लाख 45 हजार 380 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 4 हजार 167 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 60 हजार 491 जण कोरोनामुक्त झाले आहेत. हे देखील वाचा- सांगली-कोल्हापूर महापूर पूनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाला सूचना; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आपत्ती व्यवस्थापनाचा मान्सूनपूर्व आढावा

राजेश टोपे यांचे ट्वीट-

महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूमुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून ठोस पाऊले उचलली जात आहे. मात्र, अद्यापही कोरोना विषाणूबाबत सकारात्मक बदल दिसून न आल्याने नागरिकांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. देशात कोरोनाबाधितांसह कोरोनामुक्त होणाऱ्या संख्येतही वाढ होत आहे. यामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

(The above story first appeared on LatestLY on May 26, 2020 08:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).