कोरोना व्हायरसने (Corona Virus) चीनसह जगभरात थैमान घातल्याच्या बातम्या आपल्या कानावर पडत आहेत. तसेच केरळ राज्यात कोरोना व्हायरस एक रुग्ण आढळला आहे. यामुळे प्रशासनाकडून अधिक काळजी घेतली जात आहे. यातच भारतीय नागरिकांना मायदेशात परत आणण्यासाठी एअर इंडियाचे (Air India Flight) विशेष विमान वुहानला (Wuhan) दाखल झाले आहे. हे विमान उद्या 1 फेब्रुवारी रोजी भारतीय नागरिकांना घेऊन परतणार असल्याची माहिती समोर आली आहे. महत्वाचे म्हणजे, या विमानात राम मनोहर रुग्णालयातील एक पथक तैनात करण्यात आले आहे. याशिवाय या विमाना खाद्यपदार्थ, पिण्याचे पाणी यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
कोरोनो व्हायरस प्रादुर्भाव वाढला असल्याचे लक्षणे दिसत आहे. यातच भारतात कोरोना व्हायरसा रुग्ण आढळला असून तो चीनहून आल्याचे समजते आहे. यामुळे काही देशांनी चीनहून येणाऱ्या लोकांचा प्रवेश बंद केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, वुहान येथून भारतात परतलेल्या विद्यार्थ्याला कोरोना व्हारसची लागवण झाल्याची कळाले आहे. त्यानंतर चीन येथील भारतीयांना परत आपल्या देशात आणण्यासाठी एअर इंडियाचे विमान वुहान शहरात पाठवण्यात आले आहे. सध्या हे विमान वुहान येथे दाखल झाले असून शनिवारी पहाटे सर्व भारतीयांना घेऊन मायदेशात परतणार असल्याचे सांगितले जात आहे. हे देखील वाचा- Coronavirus Precautionary Advisory: जीवाघेण्या कोरोना विषाणू पासून सुरक्षित राहण्यासाठी आरोग्य मंत्रालयाकडून खास सूचना जारी; अशी घ्या काळजी!
एएनआयचे ट्वीट-
#WATCH Air India special flight from Delhi lands in Wuhan (China) for the evacuation of Indians. #coronavirus pic.twitter.com/ccJHo6rw0K
— ANI (@ANI) January 31, 2020
कोरोनो व्हायरसचा जगभरातील विविध देशांमध्ये प्रादुर्भाव वाढतच आहे. चीनमध्ये या आजाराने थैमान घातले याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी घोषीत केली आहे. याशिवाय सर्च इंजिन गुगलनेही आपल्या वाचकांना या आजाराची माहिती तातडीने उपलब्ध व्हावी, यासाठी सर्च इंजिन रिझल्ट पेजेसमध्ये बदल केले आहेत.