Mumbai: दिल्यानंतर मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) एका प्रवाशाने बॉम्बची धमकी दिल्याने गोंधळ उडाला. वृत्तानुसार, एका प्रवाशाने लखनौला (Lucknow) जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट (Indigo Flight) च्या टेक-ऑफदरम्यान सीटजवळ बॉम्ब ठेवण्यात आल्याचा दावा केला. मुंबईहून लखनौला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने सांगितले की, त्याच्या सीटखाली बॉम्ब आहे. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण सुरक्षा यंत्रणा ठप्प झाली.
मुंबईहून लखनौला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइट क्रमांक 6E 5264 मध्ये बसलेल्या एका प्रवाशाने यासंदर्भात एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. फ्लाईटमध्ये बसत असताना प्रवाशाने अचानक आपल्या सीटखाली बॉम्ब असल्याचे सांगितले. (हेही वाचा - Lengpui Airport Accident: मिझोरोममध्ये विमान धावपट्टीवरुन घसरले, आठ सैनिक जखमी)
या घटनेची माहिती मिळताच त्या विमानाच्या उड्डाणाची वेळ बदलून त्याची कसून चौकशी करण्यात आली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, तपास प्रक्रियेदरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. (हेही वाचा - Plane Lands On Highway Video: व्हर्जिनियात लहान विमानाचे महामार्गावर आपत्कालीन लँडिंग, पहा व्हिडिओ)
यानंतर, विमानतळ पोलिसांनी प्रवाशाला ताब्यात घेतले आणि त्याच्याविरुद्ध कलम 506 (2) आणि 505 (1)(बी) अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सांगितले की, आरोपीचे नाव मोहम्मद अयुब असून तो 27 वर्षांचा असून त्याने असे का केले? याचा तपास पोलीस करत आहेत.