Plane Lands On Highway Video: एका लहान प्रवासी विमानाचे शुक्रवारी व्हर्जिनियातील (Virginia) डुलेस आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (Dulles International Airport) उड्डाण घेतल्यानंतर लगेचच लॉउडॉन काउंटी येथील महामार्गावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. यावेळी विमान रेलिंगला आदळले. फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या म्हणण्यानुसार, सदर्न एअरवेज एक्सप्रेस फ्लाइट 246 ने जवळच्या वॉशिंग्टन डुलेस आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर लगेचच दुपारी 12:50 वाजता लाउडॉन काउंटी पार्कवेवर हार्ड लँडिंग करण्यात आले. सुदैवाने, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. तसेच रस्त्यावरील कारला विमानाने धडक दिली नाही. आपत्कालीन लँडिंग करण्यापूर्वी विमानाने कमाल 850 फूट उंची गाठली. FlightAware च्या माहितीनुसार, विमान डलेसहून लँकेस्टर, पेनसिल्व्हेनियाला जात होते. (हेही वाचा - Atlas Air Airliner Catches Fire: अॅटलस एअरलाइन च्या विमानाला आग; मियामी विमानतळावर करण्यात आले इमर्जन्सी लँडिंग, Watch Video)

पहा व्हिडिओ - 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)