Biryani प्रतिकात्मक प्रतिमा (PC - pixabay)

Biryani Served on Plate With Lord Ram's Photo: उत्तर दिल्लीतील जहांगीरपुरी (Jahangirpuri) येथील बिर्याणी विक्रेत्याने (Biryani Vendor) प्रभू रामाचा (Lord Rama) फोटो असलेल्या डिस्पोजेबल प्लेट्सवर बिर्याणी दिल्याने परिसरात गोंधळ उडाला आहे. रविवारी स्थानिक हिंदू संघटनांनी बिर्याणीच्या दुकानात ठेवलेल्या प्लेट्सवर भगवान रामाचा फोटो पाहिल्यानंतर ही बाब उघडकीस आली.

यासंदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर लगेच पोलिग घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी भगवान रामाचा फोटो असलेले चार प्लेट्सचे पॅकेट जप्त करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास सुरू असल्याचं पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं आहे. प्राप्त माहितीनुसार, हा विक्रेता रामाची मूर्ती असलेल्या प्लेटमध्ये बिर्याणी टाकून विकत होता. पोलिसांनीही घटनास्थळ गाठून आरोपीला अटक केली.(हेही वाचा - World's Most Expensive Biryani: जगातील सर्वात महागडी Gold Royal Biryani कुठे मिळते माहिती आहे का? जी सजवली जाते 23 कॅरेट सोन्याने)

सध्या जहांगीरपुरी पोलीस स्टेशन या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कागदी प्लेट्सच्या बंडलमधील दोन प्लेट्सपैकी एका प्लेटवर भगवान रामाचा फोटो छापलेला होता. या प्रकरणाची पाहणी सुरू आहे. ही घटना रविवारी घडल्याचे सांगण्यात येत आहे. (हेही वाचा - Biryani in West Bengal: बिर्याणी खाल्ल्यास पुरुषांचे पौरुषत्व धोक्यात? बिर्याणी व्रिकेत्याचं शटर डाऊन)

दिल्ली हे खाद्यपदार्थांसाठी देशभर प्रसिद्ध आहे. जुन्या दिल्लीतही अशी अनेक दुकाने आहेत, जिथे जेवणाची चव लोकांना वेड लावते. बिर्याणी देखील अशीच एक गोष्ट आहे, जी मोठ्या संख्येने लोकांना आवडते. मात्र खाद्यपदार्थ विकण्यासाठी धार्मिक भावना दुखावल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून या प्रकरणाबाबत सोशल मीडियावरही लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. आरोपीने हे सर्व मार्केटिंगसाठी केले, की त्याला जाणूनबुजून विशिष्ट धर्माच्या भावना दुखावायच्या होत्या, याचाही तपास पोलीस करत आहेत.