Chirag Paswan: केंद्रीय मंत्री चिराग पासवान (Chirag Paswan ) यांनी नवीन मंत्रिमंडळात अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रीपदाचा कार्यभार स्विकारला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर ते म्हणाले की, पंतप्रधानांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा संकल्प घेऊन मी येथे आलो आहे. अन्न प्रक्रिया ही मोठी जबाबदारी आहे. येणारा काळ फक्त अन्नप्रकियेचा आहे. माझे वडिल रामविलास पासवान यांच्याकडून शिकून त्यांच्या विचार पुढे नेण्यात आणि विकसित देशाचा पंतप्रधानांचा संकल्प पूर्ण करण्यात या विभागाची महत्त्वाची भूमिका मला दिसते. (हेही वाचा- रेल्वेमंत्री म्हणून अश्विनी वैष्णव दुसऱ्यांदा मंत्री पद संभाळण्यास सज्ज, कार्यलयात पंतप्रधानाचं कौतुक)
#WATCH केंद्रीय मंत्री चिराग पासवान ने नए मंत्रिमंडल में खाद्य प्रसंस्करण उद्योग मंत्री का कार्यभार संभाला। pic.twitter.com/UJiNIhXixg
— ANI_HindiNews (@AHindinews) June 11, 2024