Indian Railways | Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

यंदा 9 मार्च दिवशी होळीचा सण साजरा केला जाणार आहे. वसंत ऋतूच्या आगमनाची चाहुल देणारा हा सण उत्तर भारतामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्यामुळे वृंदावन, पटना येथे होळी, धुळवडीचा सण सेलिब्रेट करण्यासाठी जाणार्‍यांसाठी मोठ्या मध्य रेल्वेने विशेष सोय केली आहे. मध्य रेल्वे कडून एलटीटी (LTT), पुणे स्थानकातून (Pune Station) पटना, वाराणसी, दाणापूर, बल्लरशाह येथे जाणार्‍यांसाठी 26 होळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या होळी विशेष ट्रेन्सचं बुकिंग 29 फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, एलटीटी - पाटना स्पेशल, एलटीटी - वाराणसी स्पेशल, एलटीटी - एमएयू स्पेशल, पुणे-दाणापूर स्पेशल ट्रेन्सच्या प्रत्येकी 4 फेर्‍या चालवल्या जाणार आहेत. तर पुणे - बल्लारशाह स्पेशल ट्रेन्सच्या प्रत्येकी 10 फेर्‍या चालवल्या जाणार आहेत. या ट्रेन्स 5-15 मार्च दरम्यान चालवल्या जाणार असून प्रत्येक गाडीचे कोच वेगवेगळे असतील. Holi 2020 Special Trains: होळी निमित्त कोकणवासीयांसाठी मध्य रेल्वे चालवणार पनवेल, मुंबई ते करमाळी स्थानकादरम्यान 20 विशेष ट्रेन्स

 

मध्य रेल्वेचं ट्वीट

होळी सण उत्तर भारतामध्ये मोठा आकर्षणाचा विषय आहे. ब्रज ची होळी अनुभवण्यासाठी देशाच्या विविध भागांसह परदेशातूनहीपर्यटक येतात. लठमार होळीदेखील एक खास सेलिब्रेशनचा प्रकार आहे. यामध्ये एकमेकांवर रंग टाकून होळी सेलिब्रेट करण्यासोबत महिला पुरूषांना लाठी किंवा कपड्यांपासून बनवलेल्या चाबूकाने एकमेकांना फटकवतात. मथुरा आणि वृंदावन मध्ये 15 दिवसांची होळी सेलिब्रेट केली जाते.