पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 92 देशांच्या परदेशवाऱ्यांवर जवळजवळ 2 हजार कोटी रुपये खर्च केला. तसेच गेल्या तीन वर्षात देशभरात वृत्तपत्रांमध्ये मोदी यांच्या ज्या जाहिराती छापण्यात आल्या त्यासाठी चक्क 1800 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.
या प्रकरणी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड (Rajyavardhan Singh Rathore) यांनी लोकसभेत विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर दिले आहे. ब्युरो ऑफ आऊटरीच अॅन्ड कम्युनिकेशन (BOC) ही त्यांच्या खात्याच्या विभागातील केंद्र सरकारची नोडल कंपनी आहे. ही कंपनी विविध खाती आणि सरकारी उपक्रमांसाठी प्रचार करण्याचे काम करते.
नरेंद्र मोदी यांच्या जाहिरातबाजीवर 2015-16 मध्ये 579.88 कोटी रुपये, 2016-17 मध्ये 579.88 कोटी आणि 2017-18 या वर्षात648.82 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. तर फक्त वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातींसाठी हा खर्च करण्यात आल्याचे राठोड यांनी सांगितले आहे.