नवं वर्षाचे आगमन झाले आहे. सर्वजण एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात व्यस्त आहेत. यामध्येच हे नवीन वर्ष सत्तेतील राजकीय पक्षांसाठी खूप महत्वपूर्ण असणार आहे.2019 मध्ये देशात लोकसभी निवडणुक होणार आहे. तसेच गेली 5 वर्षात मोदी सरकारच्या कारभारावर आकलन करणार आहे. तर विरोधी पक्षाकडून मोदी सरकारला मोठी टक्कर मिळणार आहे. 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर भाजप पक्ष सातत्याने विविध राज्यात निवडणुक जिंकले. परंतु 2018 सरत्यावेळेस त्यांचा 5 राज्यात पराभव स्विकारावा लागला आहे. तर काँग्रेसने तीन राज्यात सत्ता स्थापन केली. त्यामुळे काँग्रेस पक्षाची येत्या निवडणुकीसाठी आशा वाढली आहे.
2019 मधील लोकसभा निवडणुकी व्यतिरिक्त ओडिसा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, हरियाणा आणि सिक्किम येथे विधानसभा निवडणुक होणार आहे. त्याचसोबत बड्या राजकीय नेत्यांचे नशीब बदलणार आहे. तर पाहूया हे 5 बडे नेते ज्यांच्यासाठी 2019 वर्ष महत्वपूर्ण ठरणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी
2019 मध्ये नरेंद्र मोदी यांची सत्वपरिक्षा असणार आहे.तसेच गेली पाच वर्षांच्या मोदी सराकारच्या कारभाराबद्दल जनता आकलन करणार आहे. 2014 नंतर भाजपला सातत्याने विजय मिळाला आहे. तर काँग्रेसने तीन राज्यात सत्ता स्थापन केल्याने भाजप चिंतेत दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा एका सत्तेतवर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपला खूप मेहनत करावी लागणार आहे.
सत्तेतील पंडितांच्या मते, 2019 मध्ये जर NDA ला बहुमत मिळाले तर मोदी सरकारचा मार्ग खडतर होणार आहे. तसेच बहुमत न मिळाल्यास एनडीएला दुसऱ्या पक्षाचे समर्थन घेण्यास भाग पडणार आहे. अशी स्थिती झाली तर नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनविण्यासाठी एकही कारण शिल्लक राहणार नाही.
राहुल गांधी
पंतप्रधान मोदींसाठी 2019 हे वर्ष जेवढे महत्वपूर्ण आहे तेवढेच राहुल गांधी यांच्यासाठी हे वर्ष महत्वाचे ठरणार आहे. डिसेंबरमध्ये 3 राज्याच्या विजयानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा दबदबा वाढला असला तरीही काही प्रश्न बाकी आहेत. तसेच राहुल गांधी विरोधी पक्ष असणार का? जे पक्ष ऐकेकाळी एनडीए सोबत होते त्यासाठी राहुल गांधी आपल्या सोबत घेऊन येणार का? राहुल गांधी पूर्वीचे नेते आणि नवीन नेत्यांमधील वाद संपणार का? तसेच राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशात महागठबंधनासाठी जागा मिळणार का? येणाऱ्या काही महिन्यात या सर्व प्रश्नांची उत्तरे समोर येणार आहेत.
नवीन पटनायक
ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यासाठी 2019 हे वर्ष महत्वाचे असणार आहे. 2019 लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभा निवडणुक ही होणार आहे. या दोन्ही निवडणुका पटनायक यांच्यासाठी अग्निपरिक्षेप्रमाणे असणार आहे. ओडिसामध्ये भाजपची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तर भाजला असे वाटते की नवीन पटनायक यांना सरकार मोठा झटका देतील. या कारणासाठीच मोदींनी राज्यात यात्रा करुन नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखालील बीजू जनता दल (बीजद) सरकारवर निशाणा साधला होता.
देवेंद्र फडणवीस
या वर्षात ऑक्टोंबर महिन्यात महाराष्ट्रातही विधानसभा निवडणुक होणार आहे. या निवडणुकीत फडणवीस यांचे नेतृत्व सरळ मार्गाने असणार आहे. फडणवीस हे महाराष्ट्रातील लोकप्रिय नेता जरी असले तरीही शिवसेना सोबत चालू असलेल्या वादामुळे काँग्रेस-एनसीपीला फायदा होऊ शकतो. तसेच फडणवीस यांच्या समोर शिवसेनेला सोबत घेऊन चालणे हे मोठे आव्हान असणार आहे.
मनोहर लाल खट्टर
महाराष्ट्रासोबत हरियाणा येथे ही विधानसभा निवडणुक होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेस पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी तयारी करत आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची परीक्षा असणार आहे. खट्टर यांच्यासाठी पुन्हा एकदा बहुमताने सरकार स्थापन करणे शक्य नसणार आहे. कारण यावेळी हरियाणामध्ये भाजपकडून काँग्रेसला मोठी टक्कर मिळणार असल्याची शक्यता आहे.