Bull Attack Video: भटक्या बैलाचा वृध्द व्यक्तीवर हल्ला, भीषण घटनेत पीडितेचा मृत्यू, व्हिडिओ व्हायरल
Bull Attack PC Twitter

Bull Attack Video: उत्तर प्रदेशात भटक्या बैलाने एका वृध्द व्यक्तीला धडक दिल्याने त्यांचा मृत्यू

झाल्याची खळबळ उडाली आहे. राज्यातील बरेली येथील ही घटना कॅमेरात कैद झाली आहे. मॉर्निग वॉकसाठी घरातून निघालेल्या एका वृध्द व्यक्तीवर हल्ला केला. या हल्लात वृध्द व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बरेली येथील संजय नगर येथील घडली घडली. (हेही वाचा- ओडिशा जाजपूर देवडा येथे भटक्या गुरांचा हल्ला, शेतकऱ्याचा मृत्यू)

मिळालेल्या माहितीनुसार, बरेली येथील संजय नगर  परिसरातील एक वृध्द व्यक्ती मॉर्निग वॉक साठी निघाले होते. काही काळ वॉक केल्यानंतर समोरून एका भटक्या बैलाने वृध्द व्यक्तीला धडक दिली. बुधवारी सकाळी (२४ जानेवारी) रोजी ही घटना घडली. बैलाने शिंगानी वृध्द व्यक्तीच्या पोटात धडक दिली. त्यानंतर पीडित खाली जमीनीवर कोसळला.

ही घटना परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बैलांनी शिंगांनी वृध्द माणसाच्या पोटात मारलं आणि धडकेने तो माणूस जमिनीवर कोसळला आणि जमिनीवर कोसळल्यानंतर बैल त्या माणसाला मारत राहिला हे या व्हिडिओत दिसत आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.दरम्यान शहरात  भटक्या प्राण्याचा हल्ला वाढत चालला आहे.  प्राण्याच्या हिसंक हल्ल्यामुळे अनेकांना दुखापत होते किंवा अनेक जण आपला जीव गमावत असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण होत आहे.