BSF Soldiers Bus Accident (फोटो सौजन्य - IANS)

BSF Soldiers Bus Accident: जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) मध्ये सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) बसला अपघात (Accident) झाला. या अपघातात तीन जवानांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे, तर 26 जवान जखमी झाले आहेत. या अपघातातील मृतांचा आकडा वाढू शकतो. बचावकार्य सुरू असून जखमींना खानसाहेब आणि बडगामच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही बस दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथून 2024 च्या जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी सैनिकांसह बडगामला जात असताना हा अपघात झाला.

जी/124 बीएसएफची बस पीएस-खानसाहेब येथील वॉटरहॉल पोलिस चौकीत निवडणूक ड्युटीसाठी जात होती. संध्याकाळी 5 च्या सुमारास बीएसएफ जवानांना घेऊन पुलवामाहून बडगामला जाणारी बस त्यांच्या पोलीस चौकी वॉटरहॉलच्या अवघ्या 600 मीटरवर खड्ड्यात पडली. दोन जवान अजूनही बसमध्ये अडकले आहेत. सीआरपीएफ, बीएसएफ, नागरी पोलीस आणि सामान्य नागरिक त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत आहेत. (हेही वाचा -BSF Personnel Injured in Mortar Explosion: पोखरण फील्ड फायरिंग रेंजमध्ये मोर्टार बॉम्बचा स्फोट; बीएसएफचे 3 जवान जखमी)

दरम्यान, बस खड्ड्यात पडल्याने बसचा चक्काचूर झाला असून बसमध्ये प्रवास करणाऱ्या बीएसएफ जवानांना गंभीर दुखापत झाली आहे. सध्या बचावकार्य सुरू असून जखमींवर तातडीने उपचार करण्यासाठी वैद्यकीय पथके पाठवण्यात आली आहेत. अधिकारी अपघाताच्या कारणाचा तपास करत आहेत.

बीएसएफ जवानांच्या बसला अपघात, पहा व्हिडिओ - 

जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात निवडणुका -

जम्मू-काश्मीरमधील 90 जागांवर तीन टप्प्यात निवडणुका होत आहेत. 18 सप्टेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान झाले. जम्मू विभागातील 3 आणि काश्मीर खोऱ्यातील 4 जिल्ह्यांतील एकूण 24 जागांवर मतदान झाले आहे. मतदानाच्या पहिल्या टप्प्यात 90 अपक्षांसह 219 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये सील झाले आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 23 लाख मतदारांची नावे मतदार यादीत होती. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 25 सप्टेंबरला आणि तिसऱ्या टप्प्याचे मतदान 1 ऑक्टोबरला होणार आहे. निवडणुकीचा निकाल 8 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात तब्बल 10 वर्षांनंतर निवडणुका होत आहेत.