Uttar Pradesh Shocker: ब्युटी पार्लरमध्ये मेकअप करताना नववधूची गोळी घालून हत्या, एक्स बॉयफेंडवर संशय, चौकशी सुरु
Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

Uttar Pradesh Shocker: उत्तर प्रदेशातील झाशी येथे ह्रदयद्रावक घटना घडली आहे. अगदी फिल्मी स्टाईलने नववधूची (Bride Murder) हत्या केली आहे. लग्नाच्यालग् तयारीसाठी ब्युटी पार्लरमध्ये गेलेल्या नववधूवर गोळीबार (Firing) करण्यात आला आहे. लग्नाच्या अवघ्या काही क्षणांपूर्वीच नववधूचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर लग्नसमारंभात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस या प्रकरणी पुढील चौकशी करत आहे. (हेही वाचा- पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अलिबागमध्ये दोन मुलांचा बुडून मृत्यू)

मिळालेल्या माहितीनुसार, काजल (22) असं हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे.  मेकअपसाठी टचअप करण्यासाठी पार्लरमध्ये गेलेल्या नववधूवर एकाने गोळीबार केला. गोळीबारच्या घटनेनंतर काजल रक्तबंबाळ झाली होती. त्याच अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, गंभीर दुखापत झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला. काजल मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यातील सोनगिरी येथील बारगाव परिसरातील रहिवासी होती. तीच लग्न उत्तर प्रजेशातील झाशी येथील राज नावाच्या तरुणासोबत होणार होते. त्यामुळे ती झाशी येथे लग्नकार्यक्रमासाठी आली. निशा गार्डन मॅरेज हॉलमध्ये तीचं लग्न होणार होते.

पार्लरमध्ये घूसून केला गोळीबार

काजल लग्न सोहळ्यासाठी तयारीकरण्यासाठी पार्लरमध्ये आली. तिच्यासोबत तिच्या मैत्रिणी आणि बहिणी होत्या. मेकअप करत असताना तिला कुणीतरी आवाज दिला. परंतु तीने बाहेर येण्यास नकार दिला. त्यानंतर बाहेर तिला कोणीतरी माझी फसवणुक केली असा मोठ मोठ्या आवाजाने बोलू लागला. काजल बाहेर न आल्यामुळे आरोपी पार्लरमध्ये घुसला आणि तिच्यावर गोळीबार केला. ती जमिनीवर बेशुध्द पडली. काही सेंकदात आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.

गुन्हा दाखल 

घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी काजलला रुग्णालयात दाखल केलं पंरतु तीचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणी पुढील चौकशी तपासणी करत आहे. आरोपी हा तिचा एक्स बॉयफेंड असल्याचा संशय आहे. आरोपीचे  नाव दिपक आहे.