 
                                                                 रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये (Alibaug) दोन मुलांचा तलावामध्ये बुडून मृत्यू झालाय. तलावामध्ये पोहताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाला आहे. या दोन्ही मुलांचे मृतदेह शोधण्याचे काम स्थानिक गावकरी आणि बचाव पथकाकडून सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच रायगडच्या खालापूरमध्ये धरणामध्ये बुडून 4 तरुणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आज दोन मुलांचा तलावामध्ये बुडून मृत्यू झाला आहे. सध्या कोकण किनारपट्टी भागात जोरदार पाऊस होत असून अशा वेळी पर्यटकांनी पाण्यात किंवा अशा ठिकाणी जाताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. (हेही वाचा - Man Rams Speeding Car Into Chiplun Hotel: पाण्याची बाटली वेळेवर न मिळाल्याने तरुणाने हॉटेलमध्ये घुसवली कार; घटना CCTV मध्ये कैद)
अलिबाग तालुक्यातील मुनवली येथील तलावामध्ये दोन मुलं बुडाली आहेत. तलावात पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने ही मुलं पाण्यामध्ये बुडाली. बेपत्ता मुलांना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातून विविध बचाव पथकांना पाचारण करण्यात आले आहे. अथर्व हाके आणि शुभम बाला अशी बुडालेल्या मुलांची नावे आहेत. अथर्वचा मृतदेह शोधण्यात स्थानिकांना यश आले तर शुभमचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे.
बुडालेली मुले परिसरातील रहिवासी असल्याचे समजते. या मुलांना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांचे प्रयत्न सुरु आहे. जिल्ह्यातून विविध बचाव पथकांना पाचारण करण्यात आलं आहे. दुर्घटनेच्या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. बुडालेल्या मुलांच्या नातेवाइकांचा किनाऱ्यावर आक्रोश सुरु आहे.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
